Bhagwangad : पाथर्डी : भगवानगडाचा (Bhagwangad) पुढील उत्तराधिकारी म्हणून तालुक्यातील एकनाथवाडी येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानचे महंत कृष्णा महाराज शास्त्री (Mahant Krishna Maharaj Shastri) यांची निवड भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री (Namdev Maharaj Shastri) यांनी केली. सोमवारी (ता.१४) एकनाथवाडी या ठिकाणाहून ग्रामस्थांनी सकाळी ८ वाजता रथामध्ये बसवून ढोल, ताशा, टाळ, मृदंग, हरी नामाचा जयघोष करत महिला भगिनी व पुरुष मंडळी हातामध्ये झेंडे, पताका घेऊन कृष्णा महाराज यांना भगवानगडावर आणण्यात आले.
नक्की वाचा: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय
शास्त्री यांचे भाविकांकडून स्वागत
एकनाथ वाडीपासून निघाल्यानंतर रस्त्यामधील मुंगसवाडे, श्रीपतवाडी, मालेवाडी, खरवंडी कासार, किर्तनवाडी या ठिकाणी कृष्णा महाराज शास्त्री यांचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले. रस्त्यावर जिकडे तिकडे गर्दीच गर्दी होती. ठिकठिकाणी जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. श्री संत भगवान बाबा की जय, नामदेव महाराज शास्त्री की जय, अशा घोषणा देत सर्व भाविक मंडळी भगवान गडाकडे पायी वाटचाल करीत होती.
अवश्य वाचा: खड्डे मुक्त शहराची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे : संग्राम जगताप
अमृत महोत्सवामध्ये गादीचे हस्तांतर (Bhagwangad)
कृष्णा महाराज यांचे मूळ गाव तेलंगणा असून ते बारा वर्षांपूर्वी भगवानगडावरती आले. त्यांनी बारा वर्षे ज्ञानेश्वरीचे संपूर्ण शिक्षण डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून घेतले. ते तीन वर्षांपासून एकनाथवाडी येथील निरंजन संस्था या ठिकाणी महंत म्हणून राहिले आहेत. भगवान गडावर श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिराचे काम सुरू असून ते काम 2026 ला पूर्ण होणार आहे. त्याच वर्षी भगवानगडाचा अमृत महोत्सव असून या अमृत महोत्सवामध्ये नवनियुक्त महंत कृष्णा महाराज शास्त्री यांना गादीचे हस्तांतर करण्यात येईल, असे डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले.
पुढील काळामध्ये कृष्णा महाराज शास्त्री हे भगवानगड व परिसराचा विकास करतील, याचा संपूर्ण विश्वास मला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे. भविष्यामध्ये अशाच माणसाची गरज भगवानगडाला आहे, अशा पद्धतीचा शब्दही त्यांनी मला दिला आहे ,असे यावेळी शास्त्री महाराज यांनी सांगितले. सायंकाळी पाच वाजता कृष्णा महाराज हे भगवान गडावर पोहोचल्यानंतर भगवानगडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी महाराज यांनी भगवान बाबांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले.