Bhagwangad : नाथषष्ठी उत्सवात भगवानगडाच्या दिंडीला अनन्यसाधारण मान – कृष्णा महाराज शास्त्री

Bhagwangad : नाथषष्ठी उत्सवात भगवानगडाच्या दिंडीला अनन्यसाधारण मान – कृष्णा महाराज शास्त्री

0
Bhagwangad : नाथषष्ठी उत्सवात भगवानगडाच्या दिंडीला अनन्यसाधारण मान – कृष्णा महाराज शास्त्री
Bhagwangad : नाथषष्ठी उत्सवात भगवानगडाच्या दिंडीला अनन्यसाधारण मान – कृष्णा महाराज शास्त्री

काल्याच्या कीर्तनाने नाथषष्ठी सोहळ्याची सांगता; हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसाद वितरण

Bhagwangad : पाथर्डी : नाथपरंपरेमध्ये श्री क्षेत्र भगवानगडाला (Bhagwangad) सर्वात महत्त्वाचे स्थान असून नाथषष्ठी उत्सवात (Nathashashthi Festival) भगवानगडाच्या दिंडीला विशेष मान दिला जातो, असे प्रतिपादन भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी कृष्णा महाराज शास्त्री (Krishna Maharaj Shastri) यांनी केले. फाल्गुन वद्य षष्ठीनिमित्त आयोजित नाथषष्ठी सोहळ्याच्या सांगता प्रसंगी त्यांनी काल्याचे कीर्तन करताना नाथांच्या अभंग, गौळण व त्यांच्या जीवनचरित्राचे विवेचन करून उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. अभंग हे नामपर, उपदेशात्मक, स्थितीपर, आदेशपर व मागणीपर असतात, तर गौळण भक्ती आणि प्रेमरसाने परिपूर्ण असते, असे सांगत त्यांनी निवडलेल्या गौळणीचे सखोल विश्लेषण केले.

नक्की वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण

भानुदास–एकनाथ नामाचा जयघोष

शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीस्थळ असलेल्या पैठण(छत्रपती संभाजी नगर)येथे फाल्गुन वद्य षष्ठी ते अष्टमीदरम्यान नाथषष्ठी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. राज्यभरातून साधुसंतांच्या दिंड्या आणि हजारो भाविक गोदावरीच्या तीरावर एकत्र येऊन भानुदास–एकनाथ नामाचा जयघोष करीत कीर्तन, भजन व नामस्मरणात सहभागी झाले. भगवानगडाहून आलेली दिंडीही या सोहळ्यात विशेष आकर्षण ठरली. फाल्गुन वद्य षष्ठी व सप्तमी या दोन दिवसांत भगवानगडाच्या फडामध्ये नामसंकीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. परंपरेप्रमाणे अष्टमीच्या दिवशी भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री आदेशानुसार कृष्णा महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

कृष्णा महाराज शास्त्री म्हणाले की, (Bhagwangad)

शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचे गुरु संत जनार्दन स्वामी यांचा जन्म, अनुग्रह व समाधी फाल्गुन वद्य षष्ठीलाच मानली जाते. नाथ महाराजांनीच या तिथीपासून षष्ठीचा उत्सव सुरू केला आणि याच दिवशी त्यांनी आपला देह गंगार्पण केला. त्यामुळे नाथांच्या जीवनात या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत भानुदास महाराजांपासून चालत आलेली विठ्ठलभक्तीची परंपरा नाथ महाराजांनी पुढे नेली.

मराठवाड्यातून नाथषष्ठीला येणारी पहिली दिंडी संत भगवानबाबांनी सुरू केली असून तेव्हापासून भगवानगडाच्या दिंडीला नाथपरंपरेमध्ये विशेष मान मिळत आहे. आजही संत एकनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यातील कीर्तनात पहिल्या चालीचा मान भगवानगडालाच दिला जातो असे त्यांनी सांगितले. सोहळ्याच्या सांगता प्रसंगी हजारो भाविकांना शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा महाप्रसाद देण्यात आला. भगवानगडाची परंपरा वै. संत भगवानबाबा, वै. संत भीमसिंह महाराज यांच्यानंतर न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पुढे सुरू असून भगवानगडाची सर्व उपसंस्थाने व भाविक भक्त ही परंपरा श्रद्धेने जपतात, असेही यावेळी नमूद करण्यात आले.