नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी; सात दिवस भागवत कथा, कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी
Bhagwangad : पाथर्डी : श्री क्षेत्र भगवानगडाच्या (Shree Kshetra Bhagwangad) वैभवशाली परंपरेतील ९२ वा नारळी सप्ताह मंगळवार (दि. ३१ मार्च) पासून बडेवाडी येथे मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. भगवानगडाचे संस्थापक संत भगवानबाबांनी (Sant Bhagwan Baba) सुरू केलेल्या या सप्ताहाच्या यजमानपदाची धुरा यंदा भगवानगडाच्या (Bhagwangad) दक्षिण बाजूस असलेल्या बडेवाडी ग्रामस्थांनी उचलली असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री (Namdev Maharaj Shastri) यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भव्य मंडप उभारणीसह विविध सुविधांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून लाखो भाविकांच्या आगमनासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
९२ वर्षांपूर्वी सुरू केलीली अनोखी संकल्पना
संत भगवानबाबांनी सुमारे ९२ वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी पखालडोह येथे ‘फिरता नारळी सप्ताह’ ही अनोखी संकल्पना सुरू केली होती. त्यांच्या पश्चात द्वितीय उत्तराधिकारी वै. भीमसिंह महाराज यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे चालवली सध्या विद्यमान मठाधिपती डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कुशल नेतृत्वाखाली सप्ताहाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.या सप्ताहात भागवताचार्य प्रकाश महाराज साठे यांच्या रसाळ वाणीतील सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा निरूपणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. तसेच रोज रात्री रामगिरी महाराज (येळेश्वर संस्थान, येळी), तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, ज्ञानेश्वर महाराज जळकीकर, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, प्रभाकर महाराज बोधले (पंढरपूरकर) आणि महंत कृष्णा महाराज शास्त्री यांची कीर्तन सेवा होणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नामदेव महाराज शास्त्री यांचे काल्याचे जाहीर कीर्तन (Bhagwangad)
दररोज पहाटे काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय राहणार आहे. सप्ताहात सहभागी होणारे यजमान ग्रामस्थ तन, मन आणि धन अर्पण करून सेवेत सहभागी होत असल्याचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते.



