Bhandardara : अकोले: स्वातंत्र्यदिनी (Independence Day) भंडारदरा (Bhandardara) धरण परिसरात भटकंती करण्यासाठी पर्यटक (Tourists) दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. यंदाही संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
१५ ते १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत हा आदेश लागू
सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरिश्चंद्र गड, कळसूबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर रतनवाडी येथे पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. स्वातंत्र्य दिनानंतर सलग दोन दिवस सुट्टी असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे सध्या पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहे. तर काही ठिकाणी काम चालू आहे. सदर भागातील रस्ते अरुंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता वाहतूक नियमांत बदल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेशात म्हटले की १५ ऑगस्ट २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
अवश्य वाचा : इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह
पर्यटकांनी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक (Bhandardara)
यानुसार रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश असेल. एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा, वाकी फाटा, चिचोंडी फाटा, यश रिसोर्ट शेंडी, भंडारदरा धरण स्पिल्वे गेट, भंडारदरा गाव – गुहिरे, रंधा मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. यातून फक्त अत्यावश्यक सेवा रुग्णवाहिका, अग्निशामक दल, शासकीय वाहने यांना वगळण्यात आले आहे. पर्यटकांनी गर्दी बघता नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असून वाहनांची देखील तपासणी होणार असल्याने मद्यपान करणे किंवा मद्य बाळगू नये, असे आवाहन राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी केले आहे.