Bhandardara : अकोले: गेल्या तीन ते चार दिवसांपासून भंडारदरा (Bhandardara), हरिश्चंद्रगड (Harishchandragad) व कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या भागात समाधानकारक पाऊस (Rain) पडत असल्यामुळे भातशेतीची रोपे चांगली बहरायला सुरुवात झाली असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. त्यामुळे लवकरच भात लावणीची कामे देखील सुरू होतील.
नक्की वाचा: नसतं साहस जीवावर बेतलं; भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून
भात लावणीच्या कामाला सुरुवात
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली, मात्र सामाधानकारक पाऊस पडत नव्हता. त्यामुळे आठवड्यात पावसाचे आगमन होवून अनेकांच्या पेरण्या बाकी होत्या. अखेर जूनच्या शेवट पावसाच्या आगमन होऊन वातारणात गारवा निर्माण झाला आणि सगळीकडे हिरवळ पसरू लागली. तर सद्यस्थितीला भातरोपाची मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. पावसाची संततधार अशीच कायम सुरू राहिली तर भात लावणीच्या कामाला देखील सुरुवात होईल आणि लावणी देखील वेळेत संपेल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अवश्य वाचा: ‘आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री’- संभाजी भिडे
संततधार पावसामुळे शेतकरी राजा सुखावला (Bhandardara)
आदिवासी भागातील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पीक घेतले जाते. यामध्ये कोलम, इंद्रायणी, १००८, काळभोर, आंबेमोहोर, बासमती, निळभात आदी पिकांची पेरणी केली जाते. दरवर्षी पेरणीच्या वेळेस पावसाचे आगमन होऊन पुन्हा सात, आठ दिवस पाऊस गायब होत असतो. मात्र यावर्षी उशीरा आलेला मान्सून सद्यस्थितीला समाधानकारक असून संततधार पडत असल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. सद्यस्थितीला पेरणी केलेले पीक चांगले उगवले असून बहरलेले भात रोपे आठ-दहा दिवसांत लावणीयोग्य तयार होऊन लावणीच्या कामाला सुरुवात देखील होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच दोन- तीन वर्षांपूर्वी नेहमीच येणाऱ्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान यावर्षी होऊ नये, अशी आशा शेतकरी राजाने व्यक्त केली आहे. अधूनमधून संततधार पडणाऱ्या पावसामुळे पाचनई, कुमशेत, आंबित, शिरपुंजे, रतनवाडी, भंडारदरा, घाटघर हा सगळा परिसर हिरवागार झाला आहे.