Bhandardara : अकोले : भंडारदरा (Bhandardara) धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णावंती नदीवरील (Krishnavanti River) वाकी जलाशय पूर्ण क्षमतेने भरला. या जलाशयातून ओव्हर फ्लोचे (Over flow) पाणी प्रवरा नदीपात्रातून ओसंडून वाहू लागले. यामुळे यापुढील काळात निळवंडे धरण (Nilwande Dam) जलदगतीने भरण्यास मदत होईल.
नक्की वाचा: शालिनी विखे पाटलांचे पांडुरंगाला साकडे; पाऊस पडू दे.. शेतकरी सुखी होऊ दे.. संकटे दूर कर
सह्याद्रीच्या डोंगररांगा धबधब्यांनी सजल्या
शनिवारी (ता.6) सकाळी भंडारदऱ्याचा पाणीसाठा 2100 दलघफूटवर पोहचला. तर निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढत होत आहे. प्रवरा व मुळा नदी खोऱ्यांच्या उगमापासून ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगा धबधब्यांनी सजल्या. सर्वप्रथम मुळा नदीवरील १९३ दलघफू क्षमतेचा अंबित लघुपाटबंधारे प्रकल्प तुडुंब भरला. त्यानंतर कोतूळ जवळील ६०० दलघफू क्षमतेचा पिंपळगाव खांड प्रकल्प ओव्हर फ्लो झाला.
अवश्य वाचा: जिल्हादंडाधिकाऱ्यांचे १२ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
भात अवणीस येणार वेग (Bhandardara)
ओव्हर फ्लोचे हे पाणी मुळा नदीतून राहुरीतील ज्ञानेश्वरसागर धरणाकडे झेपावले. निळवंडे धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील प्रवरा नदीची उपनदी असलेल्या कृष्णावंती नदीवरील ११२ दलघफू क्षमतेचा वाकी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हर फ्लो झाला. याचा अनुकूल परिणाम निळवंडे धरणातील पाणीसाठा वाढण्यास होणार आहे. मंगळवारपासून ते शुक्रवारपर्यंत पावसाची जोरदार बॅटींग झाली. असाच पाऊस जर टिकून राहिला तर भात अवणीस वेग येणार आहे.