Bhandardara : नगर : भंडारदरा धरणात गेल्या काही दिवसांपासून जाेरदार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. काल दिवसभरात ६० मिलीमीटर पावसाची नाेंद झाली. भंडारदरा (Bhandardara) धरणात सुमारे तीनशे दलघफू नवीन पाण्याची आवक हाेत उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण ९० टक्के भरले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून (Department of Water Resources) धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज (बुधवारी) कोणत्याही क्षणी प्रवरा नदीत (Pravara River) विसर्ग सोडण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा : राज ठाकरेंवर टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी
प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येण्याची शक्यता
पावसाचे माहेरघर असलेल्या घाटघर, रतनवाडी येथे पावसाचा जाेर वाढत आहे. काल झालेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ हाेत आहे. २९३ दलघफू पाण्याची आवक हाेऊन पाणीसाठा ९ हजार ८९६ दलघफू इतका झाला आहे. यामुळे जलसंपदा विभागाचे अभियंता आणि त्यांचे सहकारी पाणी साठ्यावर वाॅच ठेवून आहेत. १०४०० अथवा १०५०० दलघफू पाणीसाठा झाल्यानंतर पाणी नियंत्रणासाठी प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.