Bhandardara Centenary Festival : भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार‌ करा‌: विखे पाटील

Bhandardara Centenary Festival : भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार‌ करा‌: विखे पाटील

0
Bhandardara Centenary Festival : भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार‌ करा‌: विखे पाटील
Bhandardara Centenary Festival : भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार‌ करा‌: विखे पाटील

Bhandardara Centenary Festival : अकोले: भंडारदरा धरणाच्या शताब्दी (Bhandardara Centenary Festival) वर्षानिमित्त महोत्सवाचा सर्व विभागांनी समन्वयातून सर्वंकष कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा (Water Resources Minister) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले.

अवश्य वाचा: गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं प्रदर्शित; समर्थकांनी केला कौतुकाचा वर्षाव

संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित

जिल्हाधिकारी कार्यालयात भंडारदरा, निळवंडे पर्यटन विकास योजना, शिर्डी विकास योजना व सीना नदी विकास प्रकल्पाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; खासदार नीलेश लंके यांची माहिती

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, (Bhandardara Centenary Festival)

भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या परिसरात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा बारा महिन्यांचा कार्यक्रम तयार करण्यात यावा. हे करत असताना स्थानिक लोककलांचा यात सहभाग घ्यावा, जेणेकरून स्थानिक लोककलेला वाव मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीमध्ये वाढ होण्यास मदत होईल. याठिकाणी तंबू निवास व्यवस्था, विद्युत रोषणाई यांसारख्या आकर्षक बाबींचा समावेश करावा. परिसरात जागेची कमतरता असल्याने त्याबाबत सुयोग्य नियोजन करावे. वन विभागानेही पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक तो आराखडा तयार करावा.

हे देखील वाचा: 32 तास अन् बघ्यांचा कोडगेपणा; राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दांत ‘वार’