Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचा नामकरण सोहळा जीवनातील आनंदाचा क्षण: पिचड

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचा नामकरण सोहळा जीवनातील आनंदाचा क्षण: पिचड

0
Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचा नामकरण सोहळा जीवनातील आनंदाचा क्षण: पिचड
Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचा नामकरण सोहळा जीवनातील आनंदाचा क्षण: पिचड

Bhandardara Dam : अकोले: भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ (adya krantikarak veer raghoji bhangre jalashay) असा अध्यादेश ४ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) काढला होता. माझ्या हस्ते आज मोठा ऐतिहासिक नामकरण सोहळा संपन्न होत आहे, हे माझे भाग्य समजतो. हा माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अकोले तालुक्यात असे अनेक क्रांतिकारक अनेक गावांमध्ये असून त्या-त्या गावात त्या क्रांतिकारकांची स्मारके व्हावीत, असे मत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केले.

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचा नामकरण सोहळा जीवनातील आनंदाचा क्षण: पिचड
Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचा नामकरण सोहळा जीवनातील आनंदाचा क्षण: पिचड

नक्की वाचा: शिर्डी विमानतळाच्या नवीन इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

मधुकर पिचड यांच्या हस्ते पार पडला सोहळा

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचा ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ असा ऐतिहासिक नामकरण सोहळा बुधवारी (ता.9) माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते स्पिलवे गेटवर मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, हेमलता पिचड, मंगलदास भवारी, शिवाजी धुमाळ, सीताराम देशमुख, दगडू पांढरे, दादाभाऊ बगाड, सीताराम भांगरे, सोमनाथ मेंगाळ, गोविंद साबळे, काळू भांगरे, पांडुरंग खाडे, काशिनाथ साबळे, भरत घाणे, सी. बी. भांगरे, अनंत घाणे यांसह आदिवासी समाज बांधव, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी वीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये आदिवासी बांधवांनी नृत्य केले.

अवश्य वाचा: नगर जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर

माजी मंत्री मधुकर पिचड म्हणाले, (Bhandardara Dam)

आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा इतिहास शोधण्यासाठी कै. डॉ. गोविंद गारे यांना लंडनला पाठविले, तेथे ब्रिटिशांच्या ग्रंथालयात डॉ.गारे यांनी राघोजी भांगरे यांचा इतिहास शोधून काढला तो इतिहास डॉ. गारे यांनी लिहिलेल्या पुस्तक रूपाने आपल्या समोर मला आणता आला. ठाणे येथील कारागृहात वीर राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारले, तसेच चौकाला नाव दिले. वीर राघोजी भांगरे यांनी ब्रिटिशांविरुद्ध या भागात लढा दिला त्यांची आठवण चिरंतन राहण्यासाठी या ब्रिटीश सरकारने बांधलेल्या या धरणाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय नाव देण्याचा प्रस्ताव दिला त्यास राज्य सरकारने मान्यता दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. स्वागत व प्रास्ताविक सी. बी. भांगरे यांनी केले. सूत्रसंचालन शिवराम कोंडार यांनी केले तर आभार भरत घाणे यांनी मानले.