Bharat Bandh News : देशातील कामगार संघटनेने (Labor Unions) उद्या (ता.९) रोजी भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या या बंदमध्ये देशभरातील २५ कोटी कामगार भाग घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे देशातील प्रमुख सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस, बांधकाम यासह अनेक क्षेत्रातील कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहे.
नक्की वाचा : ‘मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात’, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
देशातील १० प्रमुख कामगार संघटनांनी या भारत बंदची घोषणा केली आहे. तसेच इतर कामगार संघटनांही त्यामध्ये भाग घेणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने कामगार विरोधी, शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. सरकारच्या या धोरणांचा फायदा फक्त उद्योगपतींना, त्यांच्या उद्योगांना होणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.
अवश्य वाचा : ‘मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार’-सुप्रिया सुळे
काय बंद ? (Bharat Bandh News)
बँकिंग सेवा
विमा कंपन्यांचे काम
पोस्ट ऑफिस
कोळसा खाणींचे काम
राज्य वाहतूक सेवा (सरकारी बसेस)
महामार्ग आणि रस्ते बांधकाम
सरकारी कारखाने आणि कंपन्यांचे उत्पादन.
काय सुरू ? (Bharat Bandh News)
बहुतेक खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे काम सुरू असेल.
रुग्णालये, वैद्यकीय आपत्कालीन सेवा सामान्य राहण्याची अपेक्षा आहे.
खाजगी शाळा/महाविद्यालये आणि ऑनलाइन सेवा.
बंद नेमका कशामुळे ?(Bharat Bandh News)
कामगार संघटनांनी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे १७ प्रमुख मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली होती.मात्र केंद्र सरकारकडून त्याला कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. त्याचमुळे ९ जुलै रोजी भारत बंदची हाक देण्यात आल्याचं कामगार संघटनांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणारी वार्षिक कामगार परिषद गेल्या १० वर्षांपासून घेण्यात आली नाही. त्याचवेळी सरकारने चार कामगार कायदे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे भविष्यात कामगार संघटना खिळखिळ्या करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे.