Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ उद्या महाराष्ट्रात धडकणार

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो न्याय यात्रा उद्या (ता.१२) महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. नंदूरबार येथून भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल.

0
Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo Nyay Yatra

नगर : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो न्याय यात्रा उद्या (ता.१२) महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. नंदूरबार (Nandurbaar) येथून भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल, या यात्रेची जय्यत तयारी महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या दरम्यान, राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा : फडणवीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका’ – मनोज जरांगे

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येणार (Bharat Jodo Nyay Yatra)

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येणार असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार, आमदार बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, खासदार के.सी.वेणूगोपाल, यांच्यासह अनेक नेते जिल्ह्यात येणार असून भारत जोडो यात्रेची तयारी करणार आहेत. राहुल गांधी यांची १७ मार्चला मुंबई शिवाजी पार्क मैदानावर विराट सभाही होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित राहतील.

अवश्य वाचा : महिला दिनी केदार शिंदेंची मोठी घोषणा;’आईपण भारी देवा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेचा प्रचार (Bharat Jodo Nyay Yatra)

राज्य सरकारकडून या सभेला परवानगी देण्यात आली आहे. सभेच्या सुरक्षेसंदर्भात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा करणार आहेत. दरम्यान, राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येत असल्यामुळे लोकसभेची प्रचाराची सुरुवात नंदुरबार पासून करणार असून जिल्ह्यातील आदिवासी मतदारांना आपल्याकडे घेण्यासाठी काय आश्वासन देणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here