Bhaskar Patil : सांस्कृतिक कार्यक्रमांमधून चांगले कलाकार निर्माण होतील : भास्कर पाटील

Bhaskar Patil : सांस्कृतिक कार्यक्रमांमधून चांगले कलाकार निर्माण होतील : भास्कर पाटील

0
Bhaskar Patil : सांस्कृतिक कार्यक्रमांमधून चांगले कलाकार निर्माण होतील : भास्कर पाटील
Bhaskar Patil : सांस्कृतिक कार्यक्रमांमधून चांगले कलाकार निर्माण होतील : भास्कर पाटील

Bhaskar Patil : नगर : जिल्हा परिषदेच्या शाळेमधून (Zilla Parishad School) परिपूर्ण विद्यार्थी घडतात. जिल्हा परिषद शाळा क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुणवत्ता या सर्वच बाबतीत अग्रेसर करण्याचा प्रयत्न आहे. सांस्कृतिक स्पर्धा (Cultural Competition) उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी भास्कर पाटील (Bhaskar Patil) यांनी केले.

नक्की वाचा : ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा

जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा नगरमधील कल्याण रोडवरील जाधव मंगल कार्यालयात घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लेखा अधिकारी रमेश कासार, विस्तार अधिकारी जयश्री कार्ले, कांतीलाल ढवळे, राधाकिसन शिंदे, भाऊसाहेब साठे, सुनील शिंदे, महेश येनगंदुल, परिक्षक शर्मिला गोसावी, हेमलता पाटील, दशरथ खोसे, प्राध्यापक सी. व्ही. जोशी , संतोष नगरकर, श्रीकांत ढगे आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : मढी ग्रामसभेतील ठरावाचे जिल्हाभर पडसाद

मिशन आरंभ हा उपक्रम सुरू (Bhaskar Patil)

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून मिशन आरंभ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा राज्यभर अवलोकन होत आहे. शिक्षक वेगवेगळ्या कंपन्या असतील गाव सहभाग शाळेचा चेहरा मोहरा बदलला आहे. केंद्र, तालुकास्तरावरील सांस्कृतिक स्पर्धांमधून उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे. यात पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन गटातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दोन्ही गटांचे प्रत्येकी चौदा असे एकूण २८ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सूत्रसंचालन जयश्री कार्ले यांनी तर रमेश कासार यांनी आभार मानले.