Bhaskargiri Maharaj : निवडणूक प्रक्रियेत कधी भाग घेतला नाही; भविष्यातही घेणार नाही: भास्करगिरी महाराज

Bhaskargiri Maharaj : निवडणूक प्रक्रियेत कधी भाग घेतला नाही; भविष्यातही घेणार नाही: भास्करगिरी महाराज

0
Bhaskargiri Maharaj

Bhaskargiri Maharaj : नेवासा : तालुक्यातील देवगड (Devgad) संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज (Bhaskargiri Maharaj) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा घडत होत्या. तसेच काही प्रसारमाध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे भास्करगिरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रक काढून खुलासा केला आहे की, प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष निवडणूक (Election) प्रक्रियेमध्येही आम्ही आजपर्यंत कधीच भाग घेतलेला नाही आणि भविष्यातही घेणार नाही. महाराजांनी असे स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हे देखील वाचा : मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘ही’औषधे होणार स्वस्त

आम्ही कुठल्याही राजकारणात निश्चितच नाही (Bhaskargiri Maharaj)

गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी श्री क्षेत्र देवगड येथे देवस्थानचे उत्तराधिकारी म्हणून १९७५ साली आमची नियुक्ती केली. यामध्ये हरिचिंतन-धर्मकार्य-कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रचार प्रसार करणे अभिप्रेत असून श्री गुरूंच्या आदेशानुसार गेली ५० वर्ष हे कार्य अविरतपणे सुरू आहे. नुकतेच काही प्रसारमाध्यमांमध्ये ‘भास्करगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ते वाचून आमचे मन व्यथित झाले. राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारी, वेगवेगळ्या जाती धर्मातील, वेगवेगळ्या पक्षातील मातब्बर मंडळी ही रात्रंदिवस देश तथा राज्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. हे कार्य त्यांच्याकडून उत्तम घडत राहो ही सदिच्छा. परंतु वैयक्तिक आमचा कुठल्याही राजकीय तथा पक्ष संघटनेशी दूरदूर पर्यंत संबंध नाही तसेच कुठलेही राजकीय पद भोगण्याची आम्हाला अभिलाषाही नाही. प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्येही आम्ही आजपर्यंत भाग घेतलेला नाही आणि भविष्यातही घेणार नाही. त्यामुळे या निवेदनाद्वारे प्रसारमाध्यमे तथा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व तमाम जनतेस आम्ही ज्ञात करू इच्छितो की आम्ही कुठल्याही राजकारणात निश्चितच नाही.

नक्की वाचा: कापड कारखान्यातील व्यवस्थापकाला लुटणारे जेरबंद; १० लाख रुपये हस्तगत

सर्व पक्ष आमच्यासाठी समान (Bhaskargiri Maharaj)


विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून श्रीराम जन्मभूमी मुक्तीसाठी सुरुवातीच्या कालखंडापासून आम्ही धर्मकार्य म्हणून सक्रिय सहभाग नोंदवला आहे. साधू संतांच्या कृपाशीर्वादाने व जनता जनार्दनाच्या इच्छेने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे मंदिर भव्यदिव्य स्वरूपात पूर्ण झाले. हा आमच्यासाठी आनंदाचा भाग आहे. तथापि, यामध्ये कुठल्याही संघटनेचा संबंध नव्हता. धर्मकार्य म्हणून सर्व जाती धर्मातील लोक या कार्यात एकत्र आलेच पण अनेक पक्षातील मंडळीही रामभक्त म्हणून या कार्यात सहभागी झाले. त्यांचेही आम्ही स्वागतच केले. राजकारण प्रवेश हा विषय आम्ही स्वप्नातही विचार न केलेला भाग आहे, जी मंडळी या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा, याबाबत कुठलाही गैरसमज करू नये व कृपया या आशयाच्या बातम्या कुणीही प्रसारित करू नये, ही विनंती असे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

नक्की वाचा: बनावट नोटा तयार करणारे दोघे जेरबंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here