Bhausaheb Thorat : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

Bhausaheb Thorat : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
Bhausaheb Thorat : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Bhausaheb Thorat : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Bhausaheb Thorat : संगमनेर : अमृत उद्योग समूहाचे (Amrut Udyog Group) जनक स्वातंत्र्यसेनानी आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे प्रेरणास्थान असलेले सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (Bhausaheb Thorat) यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (ता. १४) मार्च सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली कार्यक्रम तसेच ज्येष्ठ संपादक व लेखक मल्हार अरणकल्ले (Malhar Arankalle) यांचे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या जीवनचरित्रावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी दिली.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात ‘हिंदू संमेलना’ला बहुजन संघटनांचा विरोध; पोलीस प्रशासनाला निवेदन

आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे मोठे कार्य

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे मोठे कार्य भाऊसाहेब थोरात यांनी केले. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्यानंतर त्यांनी आयुष्यभर सहकाराच्या माध्यमातून शेतकरी,कामगार आणि ग्रामीण समाजाच्या उन्नतीसाठी काम केले. जिल्हा सहकारी बँक तसेच राज्य सहकारी बँकेच्या नेतृत्वातून त्यांनी शेती आणि शेतीपूरक उद्योगांना बळ देण्याचे काम केले. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि सहकाराच्या मूल्यांची रुजवण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

अवश्य वाचा : पाण्यापासून वंचित गावांसाठी उपसा सिंचन योजनेची मागणी; खताळ यांनी वेधले लक्ष

आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन (Bhausaheb Thorat)

सचोटी, पारदर्शकता आणि शेतकरी हिताचा ध्यास या मूल्यांवर उभा असलेला अमृत उद्योग समूह ही त्यांच्या कार्याची जिवंत परंपरा मानली जाते. सहकार क्षेत्रात आदर्श मानल्या जाणाऱ्या या कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शनिवार (ता. १४) मार्च सकाळी ९ वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृतीस्थळी आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या सहकार चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

 भाऊसाहेब थोरात यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान

त्यानंतर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात ज्येष्ठ संपादक आणि लेखक मल्हार अरणकल्ले यांचे भाऊसाहेब थोरात यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानातून भाऊसाहेबांच्या कार्याचा, सहकार चळवळीतील त्यांच्या नेतृत्वाचा आणि ग्रामीण समाजासाठी त्यांनी उभ्या केलेल्या आदर्शांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार, (ता. 13) मार्च सायंकाळी 5 वाजता, सभागृह, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, प्रशासकीय भवन येथे ‘भजनसंध्या’ आयोजित केलेली आहे.