
Bhausaheb Wakchaure : नगर : केंद्र पुरस्कृत योजनांची (Centrally sponsored schemes) अंमलबजावणी करताना प्रत्येक अधिकाऱ्याने परस्पर संवाद व समन्वय राखून योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी दिले. तर केंद्र पुरस्कृत योजनांची जिल्ह्यात गतीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना सहअध्यक्ष खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
नक्की वाचा: भारताचा न्यूझीलंडवर सात गडी राखून दणदणीत विजय
अधिकाऱ्यांनी क्षेत्रस्तरावर सक्रिय राहावे
बैठकीस सहअध्यक्ष खासदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर आदी उपस्थित होते. खासदार वाकचौरे यांनी विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा विभागनिहाय आढावा घेतला. योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात परिणामकारक ठरेल यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्रस्तरावर सक्रिय राहावे, लाभार्थ्यांच्या अडचणी तत्काळ समजून घेऊन त्यांचे निराकरण करावे, असे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पानिपत का झाले?
रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करावीत (Bhausaheb Wakchaure)
केंद्र शासनाच्या निराधार योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्याला वेळेत मिळावा यासाठी समित्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात. एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. विजेची वाढती मागणी लक्षात घेता सौर ऊर्जेच्या वापरावर भर द्यावा. मागणीनुसार पथदिवे उपलब्ध करून द्यावेत. सफाई कामगारांना शासन निर्देशानुसार सर्व साहित्य देऊन त्यांना वेळेत वेतन मिळेल याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.


