Bhima River : कर्जत : पुणे (Pune) जिल्ह्यात मान्सून पावसाच्या जोरदार हजेरीने धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी (ता.५) सिद्धटेक (ता.कर्जत) येथील भीमा नदीचा (Bhima River) पूल पाण्याखाली गेला. सदरचा पूल पाण्याखाली गेल्याने सिद्धटेक(Siddhatek) – दौंड संपर्क तुटला आहे.

नक्की वाचा: ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे
पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता
भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने यासह पाण्याचा विसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्याने तालुका प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी नितीन पाटील आणि तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली.
अवश्य वाचा: उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; महसूलमंत्र्यांची टीका
जोरदार पावसामुळे पुण्यातील सर्वच धरणे तुडुंब भरले (Bhima River)
पुणे जिल्हयात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग दौंड येथील भीमानदी पात्रात सोडल्याने कर्जत तालुक्यातील भीमानदी परिसरात पूरग्रस्त परिस्थिती उदभवली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता सुमारे १ लाख ४० हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडल्याने अष्टविनायक सिद्धटेक (ता.कर्जत) येथील अहमदनगर – पुणे जिल्ह्यांस जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने सिद्धटेक- दौंड संपर्क तुटला आहे. सद्यस्थितीत भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने परिसरातील नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने नागरिक स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यासह काही शेतात देखील पाणी घुसले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात पावसाच्या संततधारेने विसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. भीमा नदी लगत असणाऱ्या बेर्डी, दुधोडी, जलालपूर, भांबोरा, खेड, गणेशवाडी, औटेवाडी, शिंपोरा, बाभूळगाव स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी भयभीत न होता जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्या सुचनेचे पालन करीत सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे. सिद्धटेक येथे आपत्ती व्यवस्थापन दक्ष आणि सतर्क ठेवण्यात आले आहे. प्राप्त सुचनेनुसार आणि मागणीनुसार ते कार्यान्वित राहतील. पोलीस निरीक्षक मारुती मुलूक यांनी पूर परीस्थितीची पाहणी करीत पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या. यावेळी मंडळ अधिकारी रवींद्र बेल्हेकर, ग्रामसेवक श्याम भोसले, पोलीस कर्मचारी दीपक कोल्हे, मनोज मुरकुटे, चालक शकील बेग आदी उपस्थित होते. पुराचे पाणी आणि पाण्याखाली गेलेला पूल पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.