Bhingar Camp Police Station : जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Bhingar Camp Police Station : जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

0

Bhingar Camp Police Station : नगर : प्रेमसंबंधाचे नाटक करून पीडित महिलेवर बळजबरीने अत्याचार (Sexual Abuse) केल्याचा आणि त्यानंतर जातीवरून हिणवून लग्नास नकार देत जीवे मारण्याची धमकी (Death Threat) दिल्याप्रकरणी एका तरुणासह इतर चौघांवर अहिल्यानगरच्या कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संमतीशिवाय वारंवार लैंगिक अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला, श्रीगोंदा येथील रहिवासी आहे. संकेत हिरालाल पाटील (रा. धुळे) या तरुणाने पीडितेशी भावनिक नाते जोडून वेळोवेळी प्रेमाचे नाटक केले. लग्नाचे खोटे आश्वासन देत तिच्या संमतीशिवाय वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामुळे पीडिता गर्भवती झाली असता, आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. यानंतर आरोपीने पीडितेला तू खालच्या जातीची आहेस, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे म्हणून तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.

जीवे मारण्याची धमकीही (Bhingar Camp Police Station)

तसेच, पीडितेला उड्डाणपुलावरून खाली ढकलून जीवे मारण्याची धमकीही दिली. याशिवाय, हिरालाल पाटील (पूर्ण नाव माहिती नाही रा. धुळे), प्रसाद भिवसेने (पूर्ण नाव माहिती नाही रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा) आणि संदेश वंजारी (पूर्ण नाव माहिती नाही रा. निंबवी, ता. श्रीगोंदा) या संशयित आरोपींनी पीडितेला संकेत पाटील याच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी शिवीगाळ करत धमकावले आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अत्याचार, ॲट्रॉसिटी आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.