Bhingar Camp Police Station : अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल कृत्य; तरूणाविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhingar Camp Police Station : अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल कृत्य; तरूणाविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

Bhingar Camp Police Station : नगर : भिंगार कॅम्प पोलीस ठाणे (Bhingar Camp Police Station) हद्दीत घरात घुसून दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लिल चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात पीडित अल्पवयीन मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात विनयभंग (Molestation), पोक्सो (Pocso Act) आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा ‘पारनेर बंद’

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश

अजय विजय थोरात (वय ३८ रा. बुऱ्हाणनगर, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुली सोमवारी (ता. १५) दुपारी चार वाजता शाळेतून घरी आल्यावर संशयित आरोपी अजय थोरात तेथे होता. फिर्यादीच्या एका मुलीने त्याला घराबाहेर जाण्यास सांगितले असता तो घराबाहेर गेला. त्यानंतर मुलींनी घराचे सेप्टी डोअर लॉक केले. दरम्यान, अजय याने पाणी पिण्याच्या बहाण्याने पुन्हा घरात प्रवेश केला. त्याने मुलींना धमकावून त्यांच्यासोबत बळजबरीने अश्लिल चाळे करत पीडितेच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली.

नक्की वाचा : महायुती म्हणून महापालिका लढवण्याचा प्रयत्न : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संशयित आरोपीचा शोध सुरू

याबाबत पालकांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी फिर्याद नोंदवून अजय थोरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीरहे करत असून संशयित आरोपीचा शोध घेत आहे.