
Bhingar Camp Police Station : नगर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share market investment) केल्यास दरमहा ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून भिंगारमधील एका तरुणाची ७ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) पुणे व नगरमधील १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Crime Registered) झाला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर ते पुणे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल
मुदत संपल्यानंतरही परतावा किंवा मुद्दल न देता फसवणूक
भिंगारमधील पंचशिलनगर येथील रहिवासी राकेश बोरगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जून २०२४ ते जून २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून रोख स्वरूप, गुगल पे आणि आरटीजीएसद्वारे ७ लाख रुपये स्वीकारले. मात्र, मुदत संपल्यानंतरही परतावा किंवा मुद्दल न देता त्यांची फसवणूक केली.
अवश्य वाचा : भारताकडून K-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;२ टन अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता
फसवणुकीचा गुन्हा दाखल (Bhingar Camp Police Station)
या प्रकरणी प्रशांत गवळी, ज्योती गवळी, प्रकाश मांगपे यांच्यासह अन्य संशयितांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


