Bhool Bhulaiyya 3:रुह बाबा विरुद्ध मोंजोलीकाची लढाई;’भुलभुलैय्या ३’ चा धमाकेदार टीझर रिलीज

0
Bhool Bhulaiyya 3:रुह बाबा विरुद्ध मोंजोलीकाची लढाई;'भुलभुलैय्या ३' चा धमाकेदार टीझर रिलीज
Bhool Bhulaiyya 3:रुह बाबा विरुद्ध मोंजोलीकाची लढाई;'भुलभुलैय्या ३' चा धमाकेदार टीझर रिलीज

नगर : अभिनेता कार्तिक आर्यनची (Kartik Aryan) मुख्य भूमिका असलेल्या ‘भुलभुलैय्या ३’ (Bhool Bhulaiyya 3) या सिनेमासाठी सगळेच उत्सुक आहेत. आता या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज (Teaser Relese) करण्यात आला. हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कार्तिक आणि अभिनेत्री विदया बालनच्या (Vidya Balan)जुगलबंदीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

नक्की वाचा : पीएम किसानचा १८ वा हफ्ता ‘या’दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

टीझरमध्ये नेमकं काय ? (Bhool Bhulaiyya 3)

‘भुलभुलैय्या ३’ च्या प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये पाहायला मिळते की,मोंजोलीकाचं सिंहासन दुसऱ्याला दिल्यामुळे ती संतापलेली असते. माझं सिंहासन दुसऱ्याला का दिलं ? असा जाब विचारून ती एका व्यक्तीला घसपटत दुसऱ्या खोलीत नेते. त्यानंतर जुना राजवाडा आणि मोंजोलीकाची बंद खोली दिसते. ज्याचं कुलूप रुहान म्हणजेच रुह बाबा तोडतो. मोंजोलीकाचा आत्मा पुन्हा एकदा मुक्त होतो. भुतांवर विश्वास नसलेला रुह बाबा आणि सिंहासन उचलणारी विद्या यांची धमाल जुगलबंदी या टीझरमध्ये पाहायला मिळते. तर तृप्ती डिमरीचीही झलक या टीझरमध्ये पाहायला मिळाली.

कार्तिक आर्यनने हा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘तुम्हाला काय वाटलं गोष्ट संपली ? रुह बाबा विरुद्ध मोंजोलिका’ या दिवाळीत असं कॅप्शन कार्तिकने या टीझरला दिलं आहे.पण अजून या चित्रपटाची रिलीज डेट त्याने जाहीर केलीली नाही. कार्तिकने हा टीझर रिलीज करताच अनेकांनी कमेंटस करत टीझरचं कौतुक केलं आहे.

चित्रपटात ‘हे’ कलाकार झळकणार (Bhool Bhulaiyya 3)

‘भुलभुलैय्या ३’ हा सिनेमा कोणत्या तारखेला रिलीज होणार हे अजून जाहीर झालेले नाही. या चित्रपटात तृप्ती डिमरी, कार्तिक आर्यन आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर अभिनेत्री माधुरी दीक्षितही या सिनेमात दिसणार असल्याची चर्चा आहे. अनिस बजमी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या आधी अभिनेत्री कियारा अडवानीने सिनेमाच्या दुसऱ्या भागात काम केलं होतं मात्र तिसऱ्या भागात ती दिसणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here