SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी महत्वाची बातमी समोर येत आहे. कारण आता दहावीच्या बोर्डाच्या (SSC Exam) परीक्षेत गणित (Maths)आणि विज्ञान (Science) या विषयांमध्ये ३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश (11th Admission) घेता घेणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे.
नक्की वाचा : विधानसभेमुळे पोलिसांच्या सुट्ट्या,रजा २५ नोव्हेंबरपर्यंत रद्द!
विद्यार्थ्यांना अकरावीत मिळणार प्रवेश (SSC Exam)
शाळेत असतांना गणित आणि विज्ञान विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात मोठी भीती असते. ही भीती जोपर्यंत त्यांच्या मनातून जात नाही, तोवर तो विषय त्यांच्या आवडीचा होणार नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये २५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी अकरावीमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अवश्य वाचा : राज्यात आज पुन्हा जोरदार पावसाच्या सरी!’या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
काय आहे नवा नियम ? (SSC Exam)
बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ पेक्षा कमी आणि २०पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी असा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकणार आहे. मात्र त्यांच्या रिझल्टवर एक विशिष्ट शेरा देण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दोन पर्याय समोर येणार आहे. एक म्हणजे प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे. मात्र हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर करायचे नाही. त्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे ज्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही त्यांना याचा फायदा होणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांसाठी गणित किंवा विज्ञान विषयाची भिती कायमची वजा होणार आहे.