BSNL-TATA Deal:जिओ,एअरटेलला धक्का; टाटा आणि बीएसएनएलमध्ये मोठा करार

नुकतेच जीओ (Jio) आणि एअरटेलने (Airtel) त्यांचे रिचार्ज प्लॅन (Recharge Plan) महाग केले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे.

0
BSNL-TATA Deal:जिओ,एअरटेलला धक्का; टाटा आणि बीएसएनएलमध्ये मोठा करार
BSNL-TATA Deal:जिओ,एअरटेलला धक्का; टाटा आणि बीएसएनएलमध्ये मोठा करार

नगर : नुकतेच जीओ (Jio) आणि एअरटेलने (Airtel) त्यांचे रिचार्ज प्लॅन (Recharge Plan) महाग केले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे. Jio आणि Airtel चे  रिचार्ज महाग झाल्यामुळे बीएसएनएलने (BSNL) टाटा सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता जिओला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा : गणेशोत्सवात मिळणार आनंदाचा शिधा!

टीसीएस आणि बीएसएनएलमध्ये 15,000 कोटीचा करार (BSNL-TATA Deal)

टाटा आता बीएसएनएलची कमान आपल्या हाती घेण्याची तयारी करत आहे. टीसीएस आणि बीएसएनएल यांच्यात 15,000 कोटी रुपयांचा करार झाला आहे. ज्यामुळे भारतातील 4G नेटवर्क आणखी वेगाने विकसीत होईल. याशिवाय 5G नेटवर्कची पायाभरणी करण्याचे कामही केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर टीसीएस आणि बीएसएनएल मिळून भारतातील सुमारे 1000 गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा पुरवणार आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतातील युजरला आता वेगवान इंटरनेट सेवा मिळणार आहे.

अवश्य वाचा : पूजा खेडकराला नगरच्या जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र?;जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले नोंदीचे वास्तव

बीएसएनएल देणार जिओ, Airtel ला देखील टक्कर (BSNL-TATA Deal)

सध्या 4G इंटरनेट सेवेवर जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत,टाटा स्पर्धेत आल्यानंतर, बीएसएनएल भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करेल आणि जिओ,  Airtel ला देखील टक्कर देईल. टीसीएस कंपनीच्या वतीने, भारतात डेटा सेंटर तयार केले जात आहे. टाटा चार क्षेत्रांमध्ये डेटा सेंटर उभारण्याचे काम करत आहे. ही डेटा केंद्रे भारतातील 4G पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करणार आहेत. त्याचवेळी, बीएसएनएल द्वारे देशभरात 9000 हून अधिक 4G नेटवर्क उभारण्याचे काम केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here