नगर : दक्षिणेसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा ‘पुष्पा २’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला(Allu Arjun) अटक (Arrested) करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये (Hyderabad) झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली आहे. हैदराबादेत झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला होता. आज त्याला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
नक्की वाचा : तामिळनाडूतील खाजगी रुग्णालयाला आग;अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू
‘पुष्पा २’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक (Allu Arjun Arrested)
अभिनेता अल्लू अर्जूनला हैदराबाद येथील चेंगराचेंगरी प्रकरणी अटक केल्याची माहिती आहे. अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा २’ चित्रपट रिलीज झाला तेव्हा प्रीमियरला अल्लू अर्जूनने हजेरी लावली.अल्लू अर्जुन येणार म्हणून त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती.
अवश्य वाचा : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास आता सीआयडीकडे!
प्रकरण काय ? (Allu Arjun Arrested)
अभिनेता अल्लू अर्जूनचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने ‘पुष्पा २’ च्या प्रीमियरसाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली. या वेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. यावेळी गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्लू अर्जूनवर मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आता हैदराबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.