Ladki bahin Yoajana: राज्य सरकारने महिलांसाठी आणलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (CM Ladki Bahin Yojana) चर्चेचा विषय ठरली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती (adjournment) देण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी ४० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झालेत. परंतु, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत.
नक्की वाचा : ‘आम्ही राज ठाकरे यांचे भोंगे उतरवू’-सुजात आंबेडकर
निवडणूक आयोगाच्या राज्यसरकारला सूचना (Ladki Bahin Yojana)
नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात,अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवण्यात आला. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
अवश्य वाचा : दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल,विषयांची संख्या वाढणार
योजनेला स्थगिती देण्याचे कारण काय ? (Ladki Bahin Yojana)
मतदारांना आर्थिक लाभ देणाऱ्या व त्यांच्यावर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजना त्वरीत थांबवल्या पाहिजेत,अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या. मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांकडे याबाबतची विचारणा केली. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे विभागाकडून या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला देण्यात आली. परिणामी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.