नगर : आषाढीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटायला निघालेल्या वारकऱ्यांना (Varkari) राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. कारण राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन (Pesion) मिळणार आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
नक्की वाचा : जिओ,एअरटेलला धक्का; टाटा आणि बीएसएनएलमध्ये मोठा करार
वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार (Varkari Pesion Scheme)
विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ केला आहे. परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वारकरी महामंडळाचे मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, महामंडळाचं भाग भांडवल ५० कोटी इतक असणार आहे. तसेच, कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे.
अवश्य वाचा : ‘मन विठ्ठल विठ्ठल गाई’ गाण्यात झळकला बालकलाकार साईराज केंद्रे
महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना (Varkari Pesion Scheme)
राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली होती. राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर आषाढी एकादशीच्या आधीच शासन निर्णय काढून राज्य सरकारनं अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये वारकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केलं जाणार आहे. तसेच, वारकऱ्यांना पेन्शन लागू केलं जाणार आहे. या महामंडळाच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाला देखील गती येईल. अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे हे महामंडळ निर्माण करण्यात आलं आहे.