School Uniform:शालेय गणवेश वाटपासंदर्भात मोठा निर्णय,स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी होणार  

0
School Uniform:शालेय गणवेश वाटपासंदर्भात मोठा निर्णय,स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी होणार  
School Uniform:शालेय गणवेश वाटपासंदर्भात मोठा निर्णय,स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी होणार  

नगर : महायुती सरकारने राज्यातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या गणवेश वाटपासंदर्भात (Uniform distribution) एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या सरकारने सरकारी शाळांमधील (Government School) विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी स्वत:उचलली होती. मात्र,आता राज्य सरकारने ही जबाबदारी शालेल व्यवस्थापन समितीवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शाळांकडून स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी केला जाईल.

नक्की वाचा : ‘राम शिंदे ‘सर’असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय’- देवेंद्र फडणवीस   

‘एक राज्य एक गणवेश’ योजना वादात  (School Uniform)

राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना सुरु केली होती.या योजनेतंर्गत सुरुवातीला राज्यातील बचतगटांना गणवेश तयार करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, या गणवेशांचा निकृष्ट दर्जा आणि कमी-जास्त मोजमाप यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता.त्यामुळे ही योजना वादात सापडली होती.एक राज्य एक गणवेश या जुन्या योजनेवर निकृष्ट दर्जाचे कापड आणि शिलाईवरून राज्य सरकारवर टीका केली जात होती. तसंच वेळेत गणवेशही उपलब्ध होत नव्हते.अर्ध वर्षे उलटूनही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते.या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने ‘एक राज्य एक गणवेश’ या योजनेत काही बदल केले आहेत.त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश पुरवठ्याची जबाबदारी आता पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येईल.

अवश्य वाचा : मायरा वायकुळ चमकणार ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चित्रपटात; चित्रपटाचे पोस्टर लॉन्च  

शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेशाची जबाबदारी  (School Uniform)

मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश दिले जातील. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीला पैसे दिले जातील आणि स्थानिक पातळीवर गणवेश घेतले जातील.त्यानुसार आता शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षाला गणवेशाचे दोन जोड उपलब्ध करुन देतील. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना वेळेवर आणि चांगल्या दर्जाचे गणवेश उपलब्ध होणार का,हे पाहावे लागेल.

योजनेत काय बदल  ?

गणवेश पुरवठ्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे.

थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा व्यवस्थापनाला निधीचे वाटप.

विद्यार्थ्यांना वेळेवर व नियमित गणवेश पुरवठा होणार.

 स्थानिक पातळीवर खरेदी व शिलाईमुळे रोजगार मिळणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here