Bihar CM Nitish Kumar Oath: मै सत्यनिष्ठा से…बिहारच्या मुख्यमंत्रीपदी दहाव्यांदा नितीश कुमार 

0
Bihar CM Nitish Kumar Oath:मै सत्यनिष्ठा से...बिहारच्या मुख्यमंत्रीपदी दहाव्यांदा नितीश कुमार 
Bihar CM Nitish Kumar Oath:मै सत्यनिष्ठा से...बिहारच्या मुख्यमंत्रीपदी दहाव्यांदा नितीश कुमार 

नगर: बिहार विधानसभा (Bihar Vidhansabha)निवडणुकीत एनडीए (NDA) भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत त्यांनी २४३ जागांपैकी २०२  जागांवर विजयमिळविला. त्यामध्ये नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या नेतृत्वात एनडीएने येथील निवडणुका लढवल्या होत्या. अखेर, बिहारचे मुख्यमंत्री (Bihar Chief Minister) म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली. बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी १० व्यांदा शपथ घेऊन सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री बनण्याचा नवा विक्रम रचला आहे. पाटणा येथील गांधी मैदानात मोठ्या जनसमुदायासमोर हा शपथविधी पार पडला.

नक्की वाचा:  राज्यात थंडीची हुडहुडी वाढली; हवामान विभागाचा अंदाज काय?

नितीश कुमारांनी घेतली शपथ (Bihar CM Nitish Kumar Oath)

शपथ घेताना नितीश कुमार म्हणाले की, “मी नितीश कुमार सच्च्या निष्ठेने प्रतिज्ञा करतो की, मी विधीद्वारे स्थापित भारताच्या संविधानाच्या प्रति सच्ची श्रद्धा आणि निष्ठा राखेन. मी भारताची प्रभुता आणि अखंडता अक्षुण्ण ठेवेन, मी बिहारचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या कर्तव्यांचा श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक पालन करेन.” असं म्हणत नितीश कुमार यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.

अवश्य वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल  

बिहारमध्ये नितीश कुमारांकडे दहाव्यांदा मुख्यमंत्रीपद  (Bihar CM Nitish Kumar Oath)

२००५ मध्ये नितीश कुमार पहिल्यांदा सत्तेवर आले, तेव्हा बिहारच्या राजकारणात ‘जंगलराज’ विरुद्ध ‘विकास’ असा थेट संघर्ष होता. पहिल्या दशकभरातील त्यांच्या सत्तेमध्ये रस्ते, शाळा, रुग्णालये आणि कायदा व सुव्यवस्था हे परवलीचे शब्द ठरले होते. राज्याचा अर्थसंकल्पही आरजेडीच्या काळात २५,००० कोटींवरून काही वर्षांत १ लाख कोटींवर पोहोचला  होता. आज तो ३.१७ लाख कोटींवर आहे. २० वर्षांत त्यांनी बिहारच्या पायाभूत व्यवस्थेला आकार दिला असल्याचे सांगितले जात आहे.