Bipin Kolhe : मैदानी खेळात मुलांनी सहभाग वाढवावा-बिपीन कोल्हे

हल्लीच्या ताण तणावाच्या जीवनात मैदानी खेळ चांगले आहेत. त्यामुळे मुलांनी त्यात जास्तीत जास्त सहभाग घेऊन स्वत:बरोबर देशाचे उज्वल भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

0
मैदानी खेळात मुलांनी सहभाग वाढवावा-बिपीन कोल्हे

Bipin Kolhe : कोपरगाव : हल्लीच्या ताण तणावाच्या जीवनात मैदानी खेळ (Outdoor Games) चांगले आहेत. त्यामुळे मुलांनी त्यात जास्तीत जास्त सहभाग घेऊन स्वत:बरोबर देशाचे उज्वल भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे (Bipin Kolhe) यांनी केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, संजीवनी युवा प्रतिष्ठान व उद्योग समुहाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील अक्षय रत्नपारखी (Akshay Ratnaparkhi) याची २५ ते २७ डिसेंबर दरम्यान आग्रा येथे भारत विरूध्द नेपाळ दरम्यान होणा-या सामन्यासाठी दिव्यांग आंतरराष्ट्रीय क्रिकेट टी-२० (International Cricket T20) संघात भारताकडुन निवड झाली आहे. या निवडीबदल त्याचा शनिवारी (ता.९) संचालक मंडळाच्या बैठकीत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

नक्की वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसची कर्जत बंदची हाक

प्रारंभी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अक्षय रत्नपारखीच्या क्रिकेट खेळाचे कौतुक करत उज्वल भवितव्यास सदिच्छा दिल्यात. संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी प्रास्तविकात अक्षय रत्नपारखी याने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत दिव्यांग क्रिकेट खेळात जे नैपुण्य दाखविले, त्यामुळे त्याची ही निवड झाल्याचे सांगितले. कोल्हे पुढे म्हणाले की, आभासी दुनियेचा विळखा प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. आई वडील, काका काकु, आजी आजोबा यांच्या ऐवजी लहान मुलांमध्ये भ्रमणध्वनीचे आकर्षण वाढले आहे. वयोवृद्धही त्याला अपवाद आहेत. त्याच्या अतिवापरामुळे मैदानी खेळाकडे युवापिढीचे  दुर्लक्ष होत आहे. अक्षय रत्नपारखी दिव्यांग जरी असले तरी त्यांनी क्रिकेटमधील आवड जपली आहे त्याची निवड हा राज्यासाठी अभिमान आहे.

अवश्य वाचा : रोहित पवार हा बिनडोक माणूस – गोपीचंद पडळकर

यावेळी अक्षय रत्नपारखी म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे आणि संजीवनी हे एक अतुट नाते आहे. त्याठिकाणी झालेला सन्मान हा आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे. जनता इंग्लिश स्कुल संवत्सर व आत्मा मालिकच्या मैदानावर नागपुरचे प्रशिक्षक उत्तम मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळात सातत्य ठेवले. पंजाब, मोहाली, राजस्थान, छत्तीसगढ़ आदी ठिकाणी विविध स्पर्धेत संवत्सर गांवचे नांव उज्वल करता आले. युवकांना ज्या खेळाची आवड आहे, त्यात जिद्द ठेवुन मार्गक्रमण केल्यास यशाचे शिखर निश्चित गाठता येते, असे सांगुन लवकरच दुबई येथील स्पर्धेतही भारत देशाचे नांव दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत उज्वल करू असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, विलासराव वाबळे, त्रंबकराव सरोदे, बापूसाहेब बारहाते, निवृत्ती बनकर, सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र सखाहरी परजणे, भाजप दिव्यांग तालुकाध्यक्ष मुकूंद काळे, ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, संजय भाकरे, राजेंद्र भाकरे, विजय काळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here