Bird : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय

Bird : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय

0
Bird : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय
Bird : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय

प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून विद्यार्थ्यांनी तयार केले बर्ड फीडर; अहिल्यानगर महानगरपालिका, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व इको क्लबचा संयुक्त उपक्रम

Bird : अहिल्यानगर : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत अहिल्यानगर महानगरपालिका (AMC), भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व इको क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून पक्ष्यांसाठी (Bird) बर्ड फीडर तयार केले. उन्हाच्या तीव्रतेत अन्न व पाण्यावाचून पक्ष्यांचे हाल होऊ नयेत, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी आहे. पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची सोय करून सामाजिक जबाबदारीचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर, अंगणात, बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची सोय करावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले आहे.

Bird : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय
Bird : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय

नक्की वाचा : दरोड्याच्या तयारीत असलेले १० आरोपी गजाआड

बाटल्यांचा पुनर्वापर करून उपयुक्त बर्ड फीडर तयार

मार्च महिन्याची सुरुवात होताच उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या उष्णतेचा विचार करून, इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून शून्य खर्चात सुंदर आणि उपयुक्त बर्ड फीडर त्यांनी तयार केले. या फीडरमध्ये तांदूळ, बाजरी, राळ, ज्वारी, गहू यासारखे धान्य आणि पाणी भरून ते मोठ्या झाडांच्या सावलीत लावण्याचा संकल्प करण्यात आला. निसर्गाचा समतोल राखणाऱ्या चिमण्यांसह अन्य पक्ष्यांसाठी मदत करणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना निसर्गाच्या अधिक जवळ आणणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे इको क्लब प्रमुख व पर्यावरणदूत सतिश गुगळे यांनी सांगितले.

अवश्य वाचा १० कोटीसाठी अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याचा खून

यशवंत डांगे यांनी या उपक्रमाचे केले विशेष कौतुक (Bird)

माझी वसुंधरा अभियान ५.० हे पर्यावरण संवर्धनासाठी राबवले जाणारे महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. यामध्ये पृथ्वी, वायू, अग्नी, जल व आकाश या पंचतत्त्वांवर आधारित विविध उपक्रम राबवले जातात. या अंतर्गत पर्यावरणपूरक जीवनशैली, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण यास प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांनी राबविलेला उपक्रम या अभियानाला बळ देणारा आहे, असे सांगत महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. शहरातील नागरिकांनीही अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.