BJP : भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ नावे घोषित; सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडेंचे पुनर्वसन

BJP : भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ नावे घोषित; सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडेंचे पुनर्वसन

0
BJP : भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ नावे घोषित; सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडेंचे पुनर्वसन
BJP : भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ नावे घोषित; सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडेंचे पुनर्वसन

BJP : नगर : विधानपरिषदेच्या (Legislative Council) ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा २ जुलै शेवटचा दिवस आहे. दरम्यान, भाजपने (BJP) आपल्या पाच जागांसाठी नावे घोषित केली आहेत. यात शेतकरी नेते तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यासह पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव आहे. त्यामुळे खोत यांच्यासह पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनावर शिक्कामोर्तब झाला आहे.

नक्की वाचा: नसतं साहस जीवावर बेतलं; भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार तयारी

विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक काहीच दिवसांवर आली आहे. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार तयारी सुरू पहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपले नाव पुढे केले आहे. तर दुसरी जागा काँग्रेसला सोडावी असा प्रस्ताव मविआच्या नेत्यांपुढे ठेवला आहे. त्यामुळे भाजपकडून कोणाची नावे पुढे येतात याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

अवश्य वाचा: ‘आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री’- संभाजी भिडे

पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांचे पुनर्वसन (BJP)

यादरम्यान भाजपने विधानपरिषदेसाठी पाच नावांची घोषणा केली. यात पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश तिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. तर लोकसभेतील निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांचे पुनर्वसन भाजपने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here