BJP : विराेधकांच्या खाेट्या प्रचाराला राेखण्यासाठी सज्ज राहा; विजया रहाटकार यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

BJP : विराेधकांच्या खाेट्या प्रचाराला राेखण्यासाठी सज्ज राहा; विजया रहाटकार यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

0
BJP : विराेधकांच्या खाेट्या प्रचाराला राेखण्यासाठी सज्ज राहा; विजया रहाटकार यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
BJP : विराेधकांच्या खाेट्या प्रचाराला राेखण्यासाठी सज्ज राहा; विजया रहाटकार यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

BJP : नगर : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला रोखण्यासाठी भाजपच्या (BJP) प्रत्येक कार्यकर्त्यांनी सज्ज राहा. कार्यकर्त्यांना बूथपासून ते सोशल मीडीयावर (Social Media) वैचारिक लढाई करावी लागणार आहे. लोकाभिमुख कामांमुळे महायुती (Mahayuti) सरकार सत्तेवर येणार असल्याने ‘अपनी सरकार अच्छी सरकार’ हा संदेश घरोघरी योजनांच्या माध्यमातून पोहचवावा, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकार (Vijaya Rahatkar) यांनी केले.

नक्की वाचा: ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे

कॉंग्रेस सरकारच्या काळात फक्त घोषणा (BJP)

भारतीय जनता पक्षाचे उत्तर नगर जिल्ह्याचे अधिवेशन राहता येथे नुकतेच पार पडले. जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार वैभव पिचड, सरचिटणीस नितीन दिनकर, नितीन कापसे, महिला जिल्हाध्यक्षा कांचन माढरे, ओबीसी मोर्चाचे प्रकाश चित्ते, बाळासाहेब गाडेकर, डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, मुकुंदराव सदाफळ आदी उपस्थित हाेते. राहाटकर म्हणाल्या, ”लोकसभा निवडणुकीत देशवासियांनी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी समर्थन दिले. ही किमया फक्त प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या योजनांची होती. कॉंग्रेस सरकारच्या काळात फक्त घोषणा होत्या. मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रधानसेवक म्हणून सेवा केल्याचे राहाटकर यांनी सांगितले.

अवश्य वाचा: उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; महसूलमंत्र्यांची टीका

लोकसभा निवडणुकीत वाईट शक्‍ती एकत्रित (BJP)

लोकसभा निवडणुकीत वाईट शक्‍ती एकत्रित आल्‍या. सरकारच्‍या विरेाधात खोटा अपप्रचार करुन दिशाभूल करण्‍याचे काम जाणीवपूर्वक त्‍यांनी केले. मात्र, संविधानामध्‍ये बदल करण्‍याचे आणि सोईनुसार त्‍याचा वापर करुन अनेक राज्‍यांची सरकार बरखास्‍त करण्‍याचे काम याच कॉंग्रेस पक्षाने केले. याचा सोयीस्‍कर विसर राहुल गांधी यांना पडला. संविधानाचा सर्वाधिक अपमान कॉंग्रेस सरकारच्‍या कार्यकाळात झाला. या उलट संविधानाचा सन्‍मान करण्‍याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कार्यकाळात झाला असल्‍याचे रहाटकर म्‍हणाल्‍या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here