BJP : ‘या’ कुख्यात गुंडासाेबत भाजप आमदार देवदर्शनाला; चर्चांना उधाण

BJP : 'या' कुख्यात गुंडासाेबत भाजप आमदार देवदर्शनाला; चर्चांना उधाण

0
BJP

BJP : नगर : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) आणि भाजपचे (BJP) आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांचा जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेत सोबत फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे. नागपंचमीला जामखेडच्या नागेश्वराची यात्रा असते. या यात्रेत गुंड निलेश घायवळ आणि भाजप आमदार राम शिंदे एकत्रित दिसून येत आहेत. निलेश घायवळवर पुणे (Pune) शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस (Police) ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

नक्की वाचा : ‘राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं’- रोहित पवार

व्हिडिओ व्हायरल होत असल्याने चर्चांना उधाण

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा फोटो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विट केला होता. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता निलेश घायवळ सोबत आमदार राम शिंदे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

अवश्य वाचा: मनाेज जरांगेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक घ्या; मराठा आरक्षणावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

वडेट्टीवार यांनीही मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका (BJP)

दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही एक्स या समाजमाध्यमावर निलेश घायवळसह काही जण मंत्रालयात फिरतानाचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here