BJP : नगर : अभिनेत्री व भाजप (BJP) खासदार कंगना राणावत (Kangana Ranaut) यांच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात (Delhi Farmer Protest) विधानामुळे वाद उद्भवताच भाजपाकडून निवेदन जाहीर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, खासदार कंगना राणावत यांनी केलेले विधान हे पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत नाही. त्यांच्या विधानाचा पक्षाशी काहीही संबंध नाही. पक्षाकडून त्यांना अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकार नाही. भाजपा पक्ष सामाजिक सौहार्द आणि “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या तत्त्वावर विश्वास ठेवतो असे जाहीर केले आहे.
नक्की वाचा: शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुतेंवर गुन्हा दाखल
शेतकरी आंदोलनावर टीका (BJP)
कंगना राणावतने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, २०२०-२१ दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. शेतकरी आंदोलनाच्या आड मोठे षडयंत्र रचले गेले होते. तसेच यामागे चीन, अमेरिका सारख्या विदेशी शक्तींचा हात असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. या विधानानंतर विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केले. कंगना राणावत यांचे विधान हे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा अवमान करणारे असून त्यांनी बिनशर्त माफी मागितली पाहीजे, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर भाजपाने कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणात्मक बाबीवर विधान करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.
अवश्य वाचा: ‘आम्ही सगळयांनाच पक्षात घेणार नाही,थर्मामीटर लावून पाहू कोण योग्य’- अनिल देशमुख
भाजपाने घेतली कंगनाच्या विधानाची गंभीर दखल (BJP)
आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीला केवळ एक महिना उरला असल्याने भाजपाने कंगनाच्या विधानाची गंभीर दखल घेतली आहे. हरियाणातूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी तीन कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होते. या विधानामुळे हरियाणातील शेतकरी वर्गाची मोठी नाराजी ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप पक्षाने जाहिराम प्रसिद्ध करून कंगना राणावतच्या विधानाचा पक्षाशी काहीही संबंध नाही. पक्षाकडून त्यांना अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकार नसल्याचे जाहीर केले आहे.