BJP : …तर भाजपमध्ये येऊन फडणवीसांची अडचण दूर करा; भाजपच्या पदाधिकाऱ्याचा बाळासाहेब थोरातांना सल्ला

BJP : …तर भाजपमध्ये येऊन फडणवीसांची अडचण दूर करा; भाजपच्या पदाधिकाऱ्याचा बाळासाहेब थोरातांना सल्ला

0
BJP

BJP : नगर : आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एवढीच काळजी असेल, तर तुम्ही भाजपमध्ये (BJP) येऊन त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचाही मार्ग मोकळा होईल, असा उपरोधिक सल्ला भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले (Shriram Ganpule) यांनी आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना दिला.

नक्की वाचा: सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट,गणपती मंडपावर दगडफेक

सोयीनूसार राजकारण करण्याची थोरात यांची नीती

भाजप पक्षामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आल्याचे वक्तव्य आमदार थोरात यांनी केले. याबाबत श्रीराम गणपुले यांनी सल्ला देऊन फडणवीस यांची अडचण दूर करण्यासाठी आमदार थोरात यांना थेट भाजपमध्येच येण्याचे आवाहन केले. सोयीनूसार राजकारण करण्याची आमदार थोरात यांची नीती संपूर्ण राज्याने पाहिली आहे. एकीकडे काँग्रेसचा निष्ठावान म्हणून मिरवून घ्यायचे आणि दुसरीकडे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या नेत्यांची हातमिळवणी करायची.

BJP

अवश्य वाचा: सोयाबीनला किमान ४ हजार ८९२ प्रतिक्विंटलचा हमीभाव; केंद्र सरकारची घोषणा

आपल्या पक्षातील दुर्दशा सुधारण्याचा प्रयत्न करा : गणपुले (BJP)

भाजप पक्ष त्यांना अडचणीचा वाटत नाही. स्वत:चा अपक्ष उमेदवार उभा करायचा. त्याच्यासाठी भाजपचा पाठिंबा घ्यायचा, शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार उभा करायचा, त्याला संस्थात्मक सर्व रसद पुरवायची, सगे-सोयऱ्यांचे राजकारण करुन जिल्ह्यात व पक्षात वजन असल्याचा खोटा आव आणायचा, हे सर्व करणाऱ्या बाळासाहेब थोरातांनी आपल्या पक्षातील झालेली दुर्दशा सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे सोडून फडणवीस आणि भाजप पक्ष यांची काळजी करणे म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि लोकाचं पहायचं वाकून, असा प्रयोग असल्याची टीका गणपुले यांनी केली.