BJP : शहरात भाजप सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ : प्रशांत मुथा

BJP : शहरात भाजप सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ : प्रशांत मुथा

0
BJP : शहरात भाजप सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ : प्रशांत मुथा
BJP : शहरात भाजप सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ : प्रशांत मुथा

BJP : नगर : भाजप (BJP) प्रदेश कार्यालयाच्या सूचनेनुसार शहरात पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियान सुरवात झाली आहे. नगर शहरात जास्तीत जस्त सदस्य नोंदणी होण्यासाठी बूथ व प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात प्रभारी नेमण्यात आले असून शहरातील २९७ बुथवर पक्षाचे पदाधिकारी सदस्य नोंदणी करण्यात येत आहे. अगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या (Election) तयारीच्या पार्श्वभूमीवर हे सदस्य नोंदणी (Member Registration) अभियान सुरु असून जास्तीत जास्त सदस्यांनी नोदंणी करून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन शहरजिल्हा सरचिटणीस प्रशांत मुथा यांनी केले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी (BJP)

भाजपच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त सदस्यता नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरचिटणीस सचिन पारखी, महिला अध्यक्षा प्रिया जानवे, महेश नामदे आदींसह मोठ्या संख्यने पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेलांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे मनोगते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली.