BJP : नगर : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगरपंचायती, नगर परिषदेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Sthanik Swarajya Sanstha) निवडणुका चार महिन्यात पार पडणार आहेत. लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था संस्थेच्या निवडणुका (Elections) ही आपली नवीन परीक्षा असणार आहे. विधानसभेमध्ये (Assembly) जसे मिरीट मध्ये पास झालो तसे आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिरीट मध्ये पास व्हायचे आहे. त्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. संघटनेच्या बळावर स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा (BJP) झेंडा फडकवणार, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
नक्की वाचा : चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारचे १० मोठे निर्णय
भाजप कार्यालयाचे फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
अहिल्यानगर येथील सहकार सभागृहामध्ये आज (ता. ६) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अहिल्यानगर येथील भाजप कार्यालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार सभागृहमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, विक्रमसिंह पाचपुते, माजी आमदार बबनराव पाचपुते, वैभव पिचड, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, नितीन दिनकर, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदींसह मंडलाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : देवेंद्र फडणवीसांचा संतोष देशमुखांच्या लेकीला फोन; बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल केलं अभिनंदन
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, (BJP)
बावनकुळे आणि चव्हाण यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पायाला भिंगरी लावून प्रवास करून सदस्य नोंदणी केली. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दीड कोटी सदस्य करणारा भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव पक्ष आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पूर्ण शक्तीने कामाला लागू या. पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा झेंडा लावूया आणि त्यानंतर उत्तम प्रशासनाचा त्या ठिकाणी परिपाठ टाकून अहिल्यादेवी होळकरांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे उत्तम प्रशासन करून दाखवू. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत बरोबरच महाराष्ट्राचा विकास करू, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.