BJP : भाजपचे जिल्हाध्यक्ष जाहीर; अहिल्यानगर जिल्ह्यात कोणताही बदल नाही

BJP : भाजपचे जिल्हाध्यक्ष जाहीर; अहिल्यानगर जिल्ह्यात कोणताही बदल नाही

0
BJP : भाजपचे जिल्हाध्यक्ष जाहीर; अहिल्यानगर जिल्ह्यात कोणताही बदल नाही
BJP : भाजपचे जिल्हाध्यक्ष जाहीर; अहिल्यानगर जिल्ह्यात कोणताही बदल नाही

BJP : नगर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जिल्हास्तरीय कार्यकारणीत मोठा बदल करण्यात येणार असल्याच्या चर्चा मागील दोन महिन्यांपासून रंगल्या होत्या. अशातच आज (ता. १३) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) व प्रदेश निवडणूक (Election) अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी राज्यातील जिल्हाध्यक्षांची ५८ जणांची यादी जाहीर केली. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात कोणताही बदल झालेला नाही.

अवश्य वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्रोची एन्ट्री; पाकिस्तानच्या हालचालीवर इस्रोच्या १० उपग्रहांची नजर

अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी यांचे नाव जाहीर

भाजपच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग व अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांचे नाव जाहीर करण्यात आले. मागील एक वर्षांपासून या दोघांकडे हे पद आहे. पक्षश्रेष्ठींनी या दोघांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांचे पद कायम ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप संघटनेत मोठा बदल होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला मोठे यश मिळाले तरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विश्वासातील हे दोघे असल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आल्याची चर्चा आहे.

अवश्य वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आदमपूर एअरबेसवर; जवानांशी साधला संवाद

राज्यातील जिल्हाध्यक्ष (BJP)

अहिल्यानगर दक्षिण – दिलीप भालसिंग
अहिल्यानगर उत्तर – नितीन दिनकर
सिंधुदुर्ग – प्रभाकर सावंत
रत्नागिरी उत्तर – सतीश मोरे
रत्नागिरी दक्षिण – राजेश सावंत
रायगड उत्तर – अविनाश कोळी
रायगड दक्षिण – धैर्यशील पाटील
ठाणे शहर – संदीप लेले
ठाणे ग्रामीण – जितेंद्र डाकी
भिवंडी – रविकांत सावंत
मिरा-भाईंदर – दिलीप जैन
नवी मुंबई – राजेश पाटील
कल्याण – नंदू परब
उल्हासनगर – राजेश वधारिया
पुणे शहर – धीरज घाटे
पुणे उत्तर (मावळ) – प्रदीप कंद
पिंपरी चिंचवड शहर – शत्रुघ्न काटे
सोलापूर शहर – रोहिणी तडवळकर
सोलापूर पूर्व – शशिकांत चव्हाण
सोलापूर पश्चिम – चेतनसिंग केदार
सातारा – अतुल भोसले
कोल्हापूर पूर्व – राजवर्धन निंबाळकर
कोल्हापूर पश्चिम – नाथाजी पाटील
सांगली शहर – प्रकाश ढंग
सांगली ग्रामीण – सम्राट महाडिक
नंदुरबार – निलेश माळी
धुळे शहर – गजेंद्र अंपाळकर
धुळे ग्रामीण – बापू खलाणे
मालेगाव – निलेश कचवे
जळगाव शहर – दीपक सूर्यवंशी
जळगाव पूर्व – चंद्रकांत बावीसकर
जळगाव पश्चिम – राधेश्याम चौधरी
नांदेड महानगर – अमर राजूरकर
परभणी महानगर – शिवाजी भरोसे
हिंगोली – गजानन घुगे
जालना महानगर – भास्करराव मुकुंदराव दानवे
जालना ग्रामीण – नारायण कुचे
छत्रपती संभाजीनगर उत्तर – सुभाष शिरसाठ
छत्रपती संभाजीनगर पश्चिम – संजय खंबायते
धाराशिव – दत्ता कुलकर्णी 
बुलढाणा – विजयराज शिंदे
खामगाव – सचिन देशमुख
अकोला महानगर – जयवंतराव मसणे
अकोला ग्रामीण – संतोष शिवरकर
वाशिम – पुरुषोत्तम चितलांगे
अमरावती ग्रामीण – रविराज देशमुख
अमरावती शहर – नितीन धांडे
यवतमाळ – प्रफुल्ल चव्हाण
पुसद – डॉ. आरती फुफाटे
मेळघाट – प्रभुदास भिलावेकर
नागपूर महानगर – दयाशंकर तिवारी
नागपूर ग्रामीण – अनंतराव राऊत
नागपूर ग्रामीण काटोल – मनोहर कुंभारे
भंडारा – आशू गोंडाणे
गांदिया – सीता रहांगडाले 
उत्तर मुंबई – दीपक तावडे
उत्तर पूर्व मुंबई – दीपक दळवी
उत्तर मध्य मुंबई – विरेंद्र म्हात्रे