BJP : भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर; अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते

BJP : भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर; अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते

0
BJP : भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर; अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते
BJP : भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर; अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते

BJP : नगर : भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्यातील जिल्हाध्यक्षांची नवी यादी आज (ता. ३१) जाहीर केली. यात अहिल्यानगर (Ahilyanagar) शहर जिल्हाध्यक्षांसह २२ जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानुसार अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी केडगावच्या अनिल मोहिते (Anil Mohite) यांची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षांची पहिली यादी जाहीर केली त्यावेळी अहिल्यानगरचे दोन जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले नव्हते मात्र, आता शहर जिल्हाध्यक्ष बदलण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

BJP : भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर; अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते
BJP : भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर; अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते

नक्की वाचा : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमाफी;एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

आमदार चैनसुख संचेती यांनी जाहीर केली यादी

भाजप प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती ही यादी आज जाहीर केली. त्यानुसार कोकण विभागातील पालघर जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत, वसई विरार जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील, उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते, नाशिक शहर जिल्हाध्यक्षपदी सुनील केदार, नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सुनील बच्छाव, नाशिक उत्तर जिल्हाध्यक्षपदी यतीन कदम, पश्चिम महाराष्ट्रातील पूर्व दक्षिण (बारामती) जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे, कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव, विदर्भतील गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी रमेश बारसागडे, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासमगुट्टवार, चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी हरिष शर्मा, वर्धा जिल्हाध्यक्षपदी संजय गाते, मराठवाड्यातील परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुरेश भुबंरे, छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्षपदी किशोर शितोळे, लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर, लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बसवराज पाटील, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी ॲड. किशोर देशमुख, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी संतुकराव हंबर्डे, बीड जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख, मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्षपदी ज्ञानमूर्ती शर्मा, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी निरज उभारे तर दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. 

BJP : भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर; अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते
BJP : भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर; अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते

अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी

अभय आगरकरांना पुन्हा संधी नाही (BJP)

भाजप अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या ॲड. अभय आगरकर यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली नाही. अहिल्यानगर दक्षिण व उत्तर येथील जिल्हाध्यक्षांना पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. मात्र, आगरकर यांना ही संधी मिळाली नाही. जिल्हाध्यक्ष निवडीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मर्जीतील व्यक्तींना पदे मिळाल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. आगरकरांचे पद जाणार अशी चर्चा झाली होती. मात्र, आगरकरांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला नकार दिला होता. मात्र, आता आगकर यांनी जिल्हाध्यक्षपदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांना आता कोणती नवी जबाबदारी पक्ष संघटना देणार यावर उलटसूलट चर्चा रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here