BJP : नगर : भाजपच्या (BJP) प्रदेश पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त करत शहर जिल्हाध्यक्षपदी केलेली नियुक्ती सार्थ ठरवत शहरात पक्ष संघटन अधिक मजबूत करणार आहे. शहरात पक्षाच्या बळकटीसाठी जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांची सांगड घालून शहराची भक्कम बूथ रचना करत आहे. येणाऱ्या महापालिकेची निवडणूक (Election) पूर्ण ताकदीने लढून महापालिकेवर (AMC) भाजपचाच झेंडा फडकावण्यासाठी कटिबद्ध होत तयारीला लागा, असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (Anil Mohite) यांनी पदाधिकाऱ्यांना केले. अहिल्यानगर शहरातील एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते.
नक्की वाचा : विशेष पोलीस पथकाचा मटका बुकींवर छापा; २२ आरोपींवर कारवाई
भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित
यावेळी सावेडी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, केडगाव मंडल अध्यक्ष भरत ठुबे, भिंगार मंडल अध्यक्ष सचिन जाधव, मध्य मंडल अध्यक्ष मयूर बोचूघोळ, ज्येष्ठ कार्यकर्ते गोकुळ काळे, राहुल जामगावकर, संतोष गांधी, अनिल निकम, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात मुस्लिम समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गीता गिल्डा म्हणाल्या, (BJP)
पक्षश्रेष्ठींनी शहर जिल्हाध्यक्ष व मंडळ अध्यक्षपदी योग्य व्यक्तींची निवड केली आहे. या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे हात बळकट करणे आपले कर्त्यव्य आहे. शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते हे जुने कार्यकर्ते असून पूर्वीपासून संघ कार्यात सक्रिय आहेत. इतके दिवस ते बॅक स्टेजला असायचे त्यामुळे प्रसिद्धी व चर्चेत आले नाहीत. मात्र, ते अनुभवी असून त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भाजपचा झेंडा नक्कीच फडकणार, असा विश्वास व्यक्त केला.