BJP : नगर : भिंगार (Bhingar) शहरातील बंद पडलेले एसटी बसस्थानक (ST Bus Stand) तत्काळ सुरु करून अद्यावत करावे, भिंगारमधून जाणारी प्रत्येक एसटी बसला येथे थांबा द्यावा, प्रवाशांच्या सर्व सोयीसुविधा १५ दिवसात उपलब्ध कराव्यात, अशी मागणी भाजपच्या (BJP) वतीने परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. अन्यथा भाजपचे पदाधिकारी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप
पदाधिकारी उपस्थित
यावेळी अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, ज्येष्ठ नेते प्रकाश लुनिया, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, भिंगार मंडल अध्यक्ष सचिन जाधव, श्यामराव बोळे, आप्पासाहेब हंचे, राजेंद्र फुलारे, रुपेश फल्ले, चेतन वसगडेकर, साहेबराव विधाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश
उदासिनतेमुळे गेल्या अनेक वर्षापासून बसस्थानक बंद (BJP)
भिंगार शहरात असलेले बसस्थानक परिवहन कार्यालयाच्या उदासिनतेमुळे गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हे बंद बसस्थानक तातडीने सुरु करावे, अशी मागणी होत आहे.