BJP : नगर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे माजी सरचिटणीस विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) यांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
हे देखील वाचा : अहमदनगरचं नामांतर आता ‘अहिल्यानगर’ हाेणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
प्रमुख भाजप नेत्यांची उपस्थिती (BJP)
भाजपच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार अशोक चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री विजयकुमार गावित, माजी आमदार अमर राजूरकर, नगर जिल्हा दक्षिणेचे भाजप अध्यक्ष दिलीप भालसिंग, कोषाध्यक्ष दादासाहेब बोठे व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
नक्की वाचा : काँग्रेसच्या विनायक देशमुखांचा भाजपत प्रवेश
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले (BJP)
“काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असतानाच काँग्रेस मधील अनेक नेते आणि पदाधिकारी भाजपत प्रवेश करीत आहेत. विशेष म्हणजे प्रवेश करणाऱ्यांनी कोणतीही अट न घालता पंतप्रधान मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला साथ देण्यासाठी भारतीय जनता पार्टी भक्कम करण्याच्या उद्देशाने प्रवेश केलेला आहे. काँग्रेस मधील अशा अनुभवी पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टी काम करण्याची योग्य संधी देऊन त्यांचा सन्मान करेल”, अशी मी ग्वाही देतो.
यावेळी काँग्रेसचे नंदुरबार येथील माजी मंत्री पद्माकर वळवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव अर्चना राठोड, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनोजकुमार सोनवणे व अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देशमुख म्हणाले, १९९० सालापासून मागील ३४ वर्षे मी काँग्रेस पक्ष संघटनेत प्रामाणिकपणे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करीत असून या राष्ट्र उभारणीच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी होण्याच्या भावनेने मी आज भाजपा प्रवेश केला आहे. पुढील काळात भारतीय जनता पार्टी जो आदेश देईल, त्याप्रमाणे आपण काम करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.