BJP : महापालिका निवडणुकीतही भाजपची विजयी घोडदौड चालू राहील : अनिल मोहिते

BJP : महापालिका निवडणुकीतही भाजपची विजयी घोडदौड चालू राहील : अनिल मोहिते

0
BJP : महापालिका निवडणुकीतही भाजपची विजयी घोडदौड चालू राहील : अनिल मोहिते
BJP : महापालिका निवडणुकीतही भाजपची विजयी घोडदौड चालू राहील : अनिल मोहिते

BJP : नगर : राज्यात नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीत (Municipal election) २२५ नगराध्यक्ष निवडून आणून भाजपने (BJP) एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. महायुतीने ८० टक्के जागा जिंकून महाआघाडीचा पुन्हा एकदा सुपडा साफ केला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांपासून (Vidhan Sabha Elections) सुरु झालेली ही विजयाची घोडदौड या पुढे अशीच वेगाने सुरू राहणर असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीतही अहिल्यानगरसह राज्यातील जास्तीत जास्त महापालिका भाजप व महायुती जिंकणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (Anil Mohite) यांनी केले.

अवश्य वाचा: रोहित पवारांवर गोळीबार करणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ढोलताशांचा गजरात फटाके फोडून विजयोत्सव साजरा

नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्याचा आनंदोत्सव सावेडी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या समोर करण्यात आला. यावेळी ढोलताशांचा गजरात फटाके फोडून व भाजपचा जयजयकार करून हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोहिते व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना व नागरिकांना जिलेबी खाऊ घालून तसेच फुगड्या खेळून आनंद साजरा केला.

नक्की वाचा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलीस प्रशासनाचा इशारा

अनिल मोहिते म्हणाले, (BJP)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा विजय संपादन केला आहे. अहिल्यानगरमधेही पालकमंत्री राधाकृष्ण वीखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मोठा विजय संपादन केला आहे. भाजपाला व महायुतीला मत रुपी आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे आभार मानले. असाच विजय अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीतही महायुतीला नक्कीच मिळणार आहे. हा विजय सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारा आहे.


यावेळी भाजपचे सरचिटणीस महेश नामदे व निखील वारे, महिला जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे, सावेडी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, युवा मोर्चा अध्यक्ष रुद्रेश अंबाडे, अनिल सबलोक, नरेंद्र कुलकर्णी, बाबासाहेब वाकळे, अशोक गायकवाड, अजय चितळे, बाळासाहेब गायकवाड, राम वडागळे, लक्ष्मीकांत तिवारी, कैलास गर्जे, रवींद्र बंब, सुवेंद्र गांधी, राहुल जामगावकर, संगीता खरमाळे, दामोदर बठेजा, कालिंदी केसकर, ज्योती दांडगे, मनोज दुलम, रामदास आंधळे, मुकुल गंधे, लीला अग्रवाल, रवी बारस्कर, देवेंद्र दुधाले, राखी आहेर, श्वेता झोंड, सतीश शिंदे, सविता तागडे, हर्षल बोरा, दिपक दरेकर, दिलावर पठाण, रेखा आहेर, उज्वला भांगे, अजिंक्य गुरावे, सुरेखा विद्ये, संजय गायकवाड, पुष्कर कुलकर्णी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.