BJP : भाजपचा ओबीसी चेहरा किशोर डागवाले यांचा उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

BJP : भाजपचा ओबीसी चेहरा किशोर डागवाले यांचा उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

0
BJP : भाजपचा ओबीसी चेहरा किशोर डागवाले यांचा उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश
BJP : भाजपचा ओबीसी चेहरा किशोर डागवाले यांचा उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

BJP : नगर : भारतीय जनता पार्टीचे ओबीसी आघाडीचे (Bharatiya Janata Party OBC wing) प्रदेश उपाध्यक्ष व माजी स्थायी समिती सभापती किशोर डागवाले (Kishor Dagwale) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) (Nationalist Congress Party (Ajit Pawar)) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. यानिमित्ताने सायंकाळी ६ वाजता पटवर्धन चौकात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचा ओबीसी चेहरा असलेले डागवाले यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाच्या चांगल्याच चर्चा शहरात रंगल्या आहेत. डागवाले यांचा संभाव्य पक्ष प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का ठरणार असून अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा: रोहित पवारांवर गोळीबार करणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अभ्यासू व अनुभवी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून परिचित

किशोर डागवाले हे शहरातील अभ्यासू व अनुभवी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. गेली ५ टर्म नगरसेवकपदी निवडून येत त्यांनी महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आदी पदांवर कामे केली आहेत. तसेच नगरपालिका असताना उपनगराध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. शिववरद प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक, शैक्षणिक. धार्मिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत.

राष्ट्रवादी काँगेसमधून लढण्याचा निर्णय (BJP)

बदलत्या राजकीय समीकरणात किशोर डागवाले यंदाची निवडणूक आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँगेसमधून लढण्याचा निर्णय घेतला आहे. डागवाले मंगळवारी होणाऱ्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाद्वारे मोठे शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.

नक्की वाचा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलीस प्रशासनाचा इशारा