BJP : भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास ते कुठल्याही पक्षातून उभे राहू दे त्यांचा प्रचार आम्ही करणार : आमदार सुभाष देशमुख

BJP : भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास ते कुठल्याही पक्षातून उभे राहू दे त्यांचा प्रचार आम्ही करणार : आमदार सुभाष देशमुख

0

BJP : नगर : राज्यभर 29 महापालिकांसाठी या निवडणुका (Municipal Election) पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये (BJP) प्रवेश होताना दिसत आहेत. सोलापुरात देखील मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश झाले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) आणि आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांचा ‘निष्ठावंत पॅटर्न’ सुरु झाला आहे. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर ते पुणे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल

भाजपचे आमदार देशमुख यांचे मोठं वक्तव्य

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या संदर्भात सोलापुरातील भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार असल्याची भूमिका जगताप यांनी घेतली आहे. जर भाजपमधून आमच्या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट मिळाले नाही तर ते महायुतीतील इतर पक्षात जातील आणि आम्ही त्याचा प्रचार करु असे देशमुख म्हणाले.

अवश्य वाचा : भारताकडून K-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;२ टन अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता

15 दिवसांपूर्वी आलेले लोक उमेदवारांच्या मुलाखती घेतायेत (BJP)

पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत असे सुभाष देशमुख म्हणाले. या निवडणुकीत उमेदवार किती खर्च करणार किंवा त्याची किती क्षमता आहे याबाबत मुलाखतीतून विचारणा होते याचं आश्चर्य वाटतं असल्याचे मत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. भाजपमध्ये अशा पद्धतीने किती खर्च करणार हे विचारण्याची पद्धत नव्हती आणि नाही असे देशमुख म्हणाले.