BJP : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ

BJP : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ

0
BJP : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ
BJP : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ

BJP : नगर : राज्यात महापालिकेच्या निवडणुकांसाठी (Municipal elections) निर्माण झालेले वातावरण पाहता सर्व महापालिकांमध्ये युतीची सत्ता येईल व जास्तीत जास्त महापौर युतीचेच होतील अशी शक्यता आहे. महापालिकेच्या विकासासाठी केंद्र व राज्य प्रमाणे अहिल्यानगर महानगरपालिकेतही (Ahilyanagar Municipal Corporation) युतीच्या विचाराची सत्ता येणे आवश्यक आहे. अहिल्यानगर मध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil), आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) तसेच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी उत्कृष्ट नियोजन केले आहे. शहर स्मार्ट व्हावे, शहरात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर यावे यासाठी केंद्र व राज्य सरकार निधी देत असल्याने जनतेने भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्याच मागे उभे राहावे. अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर बसवण्याची जबाबदारी मी सर्व जनतेवर देत आहे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केले.

अवश्य वाचा: अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन

रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रचाराचा प्रारंभ

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात महाआरती करून व नारळ वाढवून झाला. यावेळी ते दिल्लीगेट येथील सभेत व प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ.संग्राम जगताप, भाजपचे महामंत्री वीजय चौधरी व रवींद्र अनासपुरे, निवडणूक प्रभारी आ.विक्रमसिंह पाचपुते, भाजपा शहर अध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, विनायक देशमुख, सुनील रामदासी, माणिकराव विधाते यांच्यासह दोन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी माळीवाडा ते दिल्लीगेट अशी प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलीमध्ये जीपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप होते. दिल्लीगेट येथे प्रचार रॅली आल्यावर त्या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

BJP : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ
BJP : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ

नक्की वाचा : विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवक बिनविरोध

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, (BJP)

युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढलेली प्रचार रॅली ही ऐतिहासिक ठरली आहे. नागरिकांचा उस्पुर्त प्रतिसाद पाहता शहरात युतीसाठी फार सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत न भूतो ना भविष्यातील असे यश युती मिळवणार आहे. नगर शहराचा विस्तार होत असताना विकासही वेगाने होत आहे. उद्योग, व्यवसाय, रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. नगर शहर हे सुंदर व सुरक्षित भयमुक्त व्हावे यासाठी आमदार संग्राम जगताप व मी प्रयत्नशील आहोत.

आमदार संग्राम जगताप म्हणाले,

शहराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे मोठे पाठबळ मिळत आहेत. विकास निधी उपलब्ध व्हावा यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे बहुमोल सहकार्य करत आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीचे उमेदवार हे सक्षम व कार्यक्षम आहेत. तसेच कोणत्याही प्रसंगी २४ तास उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी युतीच्या उमेदवारांचे चिन्ह कमळ व घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून युतीचे उमेदवारांना विजयी करावे, अशी विनंती केली.

यावेळी युतीचे बिनविरोध निवडून आलेल्या पाची नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा सत्कार माजी महापौर भगवान फुलसौंदर व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केला तर आ.संग्राम जगताप यांचा सत्कार सुनील रामदासी व सुवेंद्र गांधी यांनी केला.