BJP : भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटलांना उमेदवारी

BJP : भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटलांना उमेदवारी

0
Sujay Vikhe

BJP : नगर : भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचे नाव आज घोषित करण्यात आले. त्यामुळे भाजपकडून (BJP) अहमदनगर लोकसभा मतदार संघाची निवडणूक कोण लढणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

हे देखील वाचा : अहमदनगरचं नामांतर आता ‘अहिल्यानगर’ हाेणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

उलट-सुलट चर्चांना आले उधाण

मागील काही दिवसांपासून खासदार विखे पाटील यांच्या नावाला भाजपच्याच काही नेत्यांकडून विरोध होताना दिसत होता. त्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र आज भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारीची यादी जाहीर केली यात खासदार विखे पाटील यांचे नाव असल्याने आत विखे हेच भाजपकडून निवडणूक लढविणार हे स्पष्ट झाले आहे.

Sujay Vikhe

हे देखील वाचा : काँग्रेसच्या विनायक देशमुखांचा भाजपत प्रवेश

भाजपच्या पहिल्या यादीत यांची नावे (BJP)

महाराष्ट्राच्या यादीत नंदुरबारमधून हिना गावित, धुळेमधून सुभाष भांबरे, जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, अकोलातून अनुप धोत्रे, वर्धातून रामदास तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवर, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, भिवंडीतून कपील पाटील, मुंबई उत्तरेतून पीयूष गोयल, मुंबई उत्तर-पूर्वमधून मिहीर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहळ, नगरमधून डॉ. सुजय विखे पाटील, बीडमधून पंकजा मुंडे, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे, माढातून रणजितसिंह निंबाळकर, सांगलीतून संजय पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here