BJP : पक्ष विरोधी भूमिका घेतलेल्या तब्बल ६९ जणांची भाजपमधून हकालपट्टी

0
(BJP) : पक्ष विरोधी भूमिका घेतलेल्या तब्बल ६९ जणांची भाजपमधून हकालपट्टी
(BJP) : पक्ष विरोधी भूमिका घेतलेल्या तब्बल ६९ जणांची भाजपमधून हकालपट्टी

BJP : नगर : भारतीय जनता पार्टी (BJP) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांच्याकडून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या ६९ कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षाकरिता पार्टीमधून निलंबन करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये (Election) राज्यातील अनेक ठिकाणी नाराजीनाट्य पाहायला मिळाले. बाहेरून आलेल्या उमेदवारांना पक्षांना तिकीट वाटप केल्याने निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले होते. अशाच कार्यकर्त्यांचे आता तब्बल ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

हेही वाचा: निलेश लंकेंनी घेतली रामदास आठवलेंची भेट

कारवाईचा बडगा

भाजप पक्ष शिस्तीसाठी ओळखला जातो. त्यामुळेच पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. दरम्यान, पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, अशा सूचनाही जिल्हाध्यक्षांनी केल्या आहेत. नाराज कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याचे अश्वासान देऊनही अनेक ठिकाणी भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी कारवाईचा बडगा उगारत आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन केलेल्या तब्बल ६९ कार्यकर्त्यांची यादी प्रसिद्ध करत भाजपने पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांसाठी स्पष्ट संदेश दिला आहे.

नक्की पहा : दादांना घातपाताचा अंदाज होता? रोहित पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

बंडखोरांना चपराक (BJP)

निलंबनाची कार्यवाही ही तात्काळ लागू करण्यात येणार असल्याने आता बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपने चांगलीच चपराक दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहे.