BJP : उद्याेजकांना पिटाळून लावणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये; भाजपच्या पदाधिकाऱ्याचा नीलेश लंकेंवर हल्लाबाेल

BJP : उद्याेजकांना पिटाळून लावणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये; भाजपच्या पदाधिकाऱ्याचा नीलेश लंकेंवर हल्लाबाेल

0
BJP
BJP : उद्याेजकांना पिटाळून लावणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये

BJP : नगर :  जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रश्नावरून विरोधकांनी डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यावर केलेल्या टीकेचा पारनेर भाजपचे (BJP) विधानसभा प्रमुख विश्वनाथ कोरडे यांनी चांगलाच समाचार घेतला. धाक दडपशाहीने उद्योजकांना पिटाळून लावणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये. नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सुपा एमआयडीसीत (MIDC) किती कंपन्या आणल्या सांगावे, अथवा त्यांच्या जाचाला कंटाळून किती कंपन्या सोडून गेल्याची यादी जाहीर करतो, असे सरळ आव्हान लंके यांना दिले.

हे देखील वाचा: ‘वाघाची शेळी झाली’; माेदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्याची राज ठाकरेंवर टीका

लंकेंना सुनावले खडेबोल (BJP)

विरोधकांनी मागील आठवड्यात सुजय विखे यांच्यावर आरोप केला होता. त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी पारनेर भाजपचे विधानसभा प्रमुख विश्वनाथ कोरडे पुढे आले असून त्यांनी लंकेंना खडेबोल सुनावले. लंके यांनी रोजगारासाठी कोणतेही कामे केली नसून उलट सुपा एमआयडीसीतून खंडणी आणि हप्ते गोळा करण्याचे काम केले. संरक्षणाच्या नावाखाली त्यांच्या माणसांच्या मार्फत धमकावून त्यांना वेठीस धरून केवळ आपला आर्थिक फायदा करून घेतला. त्यांच्या माणसांकडून व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो. कंपनीच्या मालकांकडे बसून जबरदस्ती भंगारचे ठेके, लेबर कॉन्ट्रक्ट मिळविण्याची कामे त्यांनी केली आहेत. यामुळे लंके यांनी सुजय विखे यांच्यावर आरोप करताना विचार करावा. लंके यांचे कारनामे लोकांसमोर आले, तर त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही, असा घणाघात कोरडे यांनी केला. त्यांच्या जाचामुळे अनेक कंपन्या सोडून गेल्या. त्याचे उदारण म्हणजे तोशीबा कंपनी, कंपनीने पत्राव्दारे कंपनी हलविण्याचा निर्णय जाहीर केला होता.  

BJP
BJP

नक्की वाचा: नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात;उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक

विश्वनाथ कोरडे म्हणाले (BJP)

लंके यांनी सुपा एमआयडीसीचा इतिहात पाहावा. सुजय विखे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत एकूण १ हजार ८८० कोटींच्या गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले. पालकमंत्री विखे पाटील यांनी नुकतेच महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना या एमआयडीसीत आणले. याची माहिती लंके यांनी घ्यावी. लंकेनी कोणत्या कंपनी आणण्यासाठी कुणाला भेट दिली यांची माहिती सांगावी. विखे यांच्या प्रयत्नातून सुपा जापनिझममध्ये १३ जापनीज कंपन्यांचे काम सुरू केले आहे. तर अंबर, मायडिया, मिंडा, एक्साईड, मिस्तुबुशी, वरूण ब्रेवरेज, बीएमआर, क्लोराईड मेटल्स, अथर्व फार्मा, बोक्सोविया अशा विविध कंपन्यांच्या मार्फत हजारो तरुणांना काम दिले आहे. तर लंके यांनी केवळ हप्तेखोरी करत सुपा एमआयडीसीतील उद्योजकांना त्रास देण्याचे काम केले. यामुळे विखेंच्या विकासकामापुढे लंके ठेंगणे असून त्यांनी आपली पात्रता तपासून पाहवी, असे कोरडे यांनी सांगितले.

अवश्य वाचा: मांजरीचा जीव वाचवताना विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू

Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here