BJP : देशाला माेदींचे नेतृत्व मान्य; भाजपच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता येणार : दिलीप भालसिंग

BJP : देशाला माेदींचे नेतृत्व मान्य; भाजपच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता येणार : दिलीप भालसिंग

0
BJP
BJP : देशाला माेदींचे नेतृत्व मान्य; भाजपच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता येणार : दिलीप भालसिंग

BJP : नगर : सरकारच्या योजनांची गॅरंटी देशातील जनतेला आली आहे. देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नेतृत्व स्वीकारले आहे. भाजपाच्या (BJP) नेतृत्वाखाली पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता येणार आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचाही समावेश चारशे जागांच्या ऐतिहासिक (Historical) विजयात राहील, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी व्यक्त केला आहे.

नक्की वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर राम मंदिर झालेच नसते : सुजय विखे

महायुतीच्या प्रचाराची जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी दिली माहिती (BJP)

नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून सुरू असलेल्या प्रचाराची माहीती जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भालसिंग म्हणाले, ”मागील १० वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगाच्या केंद्रस्थानी पोहचविले आहे. मोदींच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात भारत आर्थिक महासत्ता म्हणुन उदयास येईल, यात कोणतीही शंका नाही. मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. यामुळेच देशातील ३० कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले. महिलांना अनेक योजनांच्या मार्फत बळकटी देण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधात सुधारणा झाली. यामुळे मोदींच्या नेतृत्वात भारताची विकसित देशाकडे वाटचाल होत असताना देशाने मोदींवर विश्वास ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोदींच्या नेतृत्वाखाली झालेले निर्णय मतदारपर्यंत पोहचविण्याचे काम प्रचाराच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्ते करीत असल्याचे सांगितले.”

हे देखील वाचा : मतदानावर बहिष्कार टाकू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना आवाहन

विविध विकासकामे पूर्ण (BJP)

डॉ. सुजय विखे यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निधी आणुन जिल्ह्यात विविध विकासकामे पूर्ण केली आहेत. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत त्यांनी पोहचविल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी करणारा जिल्हा म्हणून नगर प्रथम क्रमांकावर असल्याकडे भालसिंग यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. राजकारणापलिकडे जाऊन आरोग्य शिबिर कोराेना संकटात केलेले काम नगर जिल्ह्यातील जनतेने अनुभवले आहे. त्यामुळेच  डॉ. सुजय विखे पाटील लोकप्रिय ठरले. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने डाॅ. विखे पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहाता पुन्हा एखादा खासदार म्हणून मोदींच्या टीममध्ये असणार आहेत. नगरच्या जनतेने विखे यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे भालसिंग म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here