BJP : नगर शहरात भाजप लढण्याच्या तयारीत; विधानसभेसाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग

BJP : नगर शहरात भाजप लढण्याच्या तयारीत; विधानसभेसाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग

0
BJP : नगर शहरात भाजप लढण्याच्या तयारीत; विधानसभेसाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग
BJP : नगर शहरात भाजप लढण्याच्या तयारीत; विधानसभेसाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग

BJP : नगर : भारतीय जनता पक्ष (BJP) नगर शहरातील विधानसभेची (Assembly) जागा लढण्याच्या तयारीत आहे.  त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावण्यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लाेढा यांनी विनाेद तावडे (Vinod Tawade) यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली.

नक्की वाचा: लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तासह एक जणावर कारवाई

नगर शहर भाजपा सेना युतीचा बालेकिल्ला

नगर शहर विधानसभेची जागा परंपरेप्रमाणे भाजपा सेना युतीचा बालेकिल्ला होता. आता प्रत्यक्ष युतीमध्ये फाटाफूट झाली असली, तरी भाजपच्या आणि शहर विकासाच्या बाजूने असणारी मते भाजपाकडेच आहेत. त्यामुळे सध्याच्या भाजप सेना युतीचा उमेदवारच येथे प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे नगर शहर विधानसभेची जागा भाजपाकडे घेण्यासाठी भाजपचे नेते विनोद तावडे यांना आग्रह करण्यात आला आहे. विनोद तावडे यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत पक्ष पातळीवर महाराष्ट्रात सर्वेक्षण आणि उमेदवारी निश्चितेची महत्त्वाची जबाबदारी होती. विधानसभा निवडणुकीत तीच जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे जागा वाटपात आणि उमेदवार निश्चितीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

अवश्य वाचा: आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज, पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ६५ एकर जागा आरक्षित

शिष्टमंडळासमवेत जाऊन तावडे यांच्याकडे मांडणी (BJP)

नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे घ्यावी, याकरता करण्यात आलेले सर्वेक्षण आकडेवारी आणि गृहीतकांची मांडणी वसंत लोढा यांनी शिष्टमंडळासमवेत जाऊन तावडे यांच्याकडे केली. नगर शहरात पाच वेळा आमदार अनिल राठोड हे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले.

नंतर झालेल्या राजकारणात शिवसेना भाजपा समोरासमोर लढली आणि मतांची फाटाफट झाली. त्यात राठोड यांचा पहिल्यांदा पराभव झाला. 
राष्ट्रवादीने विजय मिळवला. त्यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेस होती. नंतर भाजपा शिवसेना एकत्र असताना देखील राष्ट्रवादीलाच विजय मिळाला. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे फारसे मताधिक्य राहिलेले नाही, हे लोकसभा निवडणुकीने सिद्ध केले. नगर शहर विधानसभा मतदारसंघात २०१९ आणि २०२४ या दोन्ही टर्ममध्ये सुजय विखे यांना मोठे मताधिक्य मिळाले. याचाच फायदा घेऊन या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत कमळ चिन्ह फक्त लोकसभा निवडणुकीत चालले. आता ते विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिले, तर आपला उमेदवार निश्चितपणे सर्वांना भारी ठरेल. नगर शहर हे विकासापासून वंचित आहे. दुर्लक्षित आहे. विकासाला मोठा वाव आहे.

नगर शहरातील उड्डाणपूल आणि बाह्यवळण रस्ता यामुळेच नगर शहर आता विकासाच्या प्रगतीपथावर आहे, असे मतदारांना जाणवले आणि त्यांनी मोठे मतांचे दान लोकसभेत सुजय विखे यांना टाकले. तेच पुढे विधानसभेत परावर्तित व्हावे, असे जर आपल्याला वाटत असेल, तर आणि नगर शहर विधानसभेची जागा भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुती जिंकू शकेल, असा विश्वास जर आपल्याला असेल, तर ही जागा भाजपने आपल्याकडे घेऊन कमळ चिन्हावर लढवावी. महायुतीच्या माध्यमातून ती जागा विद्यमान उमेदवाराला मिळाली, तर ती सीट धोक्यात येऊ शकते, असा सर्व्ह सांगतो. त्यामुळे भाजपाला उमेदवारी मिळावी, असा आग्रह या शिष्टमंडळाने तावडे यांच्याकडे धरला. आता तावडे आणि पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here